डॉक्‍टरला धमकावणारी महिला निष्पन्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

कोल्हापूर - डॉक्‍टरला बदनामीची आणि जीवे मारण्याची धमकी देऊन दहा लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी संशयित महिलेचे नाव निष्पन्न झाले आहे.  मेघा विनोद क्षीरसागर असे तिचे नाव असून, तिचा शोध सुरू असल्याचे शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

साईक्‍स एक्‍स्टेंशन येथील डॉक्‍टरला महिलेची सोनोग्राफी व्यवस्थित केली नसल्याचे सांगून धमकावून एक हजाराची खंडणी घेऊन १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात संशयित सावंत व क्षीरसागर नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयित अविनाश सावंतला अटक केली. 

अद्याप क्षीरसागर ही महिला पोलिसांच्या हाती लागली नाही. तिचे नाव मेघा क्षीरसागर असल्याचे आज पोलिसांनी निष्पन्न केले. तिचा शोध सुरू असून लवकरच ती पोलिसांच्या हाती लागेल, असे निरीक्षक मोरे यांनी सांगितले.

Web Title: A woman threatening doctor crime news