नागरदेवळे ग्रामसभेत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

नगर : कौटुंबिक वाद असताना पीडित महिलेचे घराच्या उताऱ्यावरून नाव वगळण्यात आले. वारंवार अर्ज करूनही ग्रामपंचायतीने कारवाई न केल्याने आज पीडित महिलने ग्रामसभेसमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. 

छाया बाबासाहेब जरे (रा. नागरदेवळे, ता. नगर) असे त्या पीडित महिलेचे नाव आहे. नागरदेवळे येथील ग्रामपंचायतीने घराच्या उताऱ्यावरील नाव कायदेशीर बाबींची पूतर्ता न करता वगळले. ते नाव पूर्ववत करण्यासाठी वारंवार अर्ज करूनही ग्रामपंचायतीने लक्ष दिले नाही. नागरदेवळे येथे आज झालेल्या मासिक ग्रामसेभेत पीडित महिलेने सरपंच व ग्रामसेवकांना विचारणा करीत विषारी औषध प्रशासन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तसेच, ग्रामसेवकांच्या अंगावर शाई फेकली आणि औषध उपचार घेण्यास नकार दिला. याबाबत कौटुंबिक वादातून आईचे नाव उताऱ्यावरून कमी केले, त्यासाठी आमचा लढा सुरू आहे, असे पीडित मुलीच्या मुलाने सांगितले. दरम्यान, पोलिसांनी पीडित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल असून उपचार सुरू आहेत. 

Web Title: a woman try to suicide in nagardevale gramsabha