ऊसाचे ट्रेक्टर पलटी होवून महिला मृत्युमुखी, ड्रायव्हर फरार

महेश पाटील 
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

सलगर बुद्रुक (सोलापूर) - लवंगी ता. मंगळवेढा येथील भैरवनाथ साखर कारखांन्यावर गाळपासाठी ऊस घेवून जानाऱ्या ट्रेक्टरच्या ऊसाच्या ट्रेलर खाली चिरडून सलगर बुद्रुक येथील महिला लक्ष्मी राम कदम हिचा जागीच मृत्यु झाला. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की लवंगीतील भैरवनाथ शुगरकड़े ऊस घेवून जानारा अर्जुन महिंद्रा ट्रेक्टर (ट्रेक्टर नं एम.एच.४५ एस.६७५७) च्या पुढील ट्रेलर सलगर गावच्या कदम वस्तिजवळील वळणावर आल्यानंतर वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रेक्टरचा टेलर पलटी झाला. या अपघातात रस्त्याने जाणारी शेतमजुर महिला लक्ष्मीबाई राम कदम हिच्या अंगावर ट्रेलर पलटी झाल्याने तीचा जागिच मृत्यु झाला. 

दरम्यान सलगर बुद्रुक येथील वैद्यकीय आधिकारी डॉ अनिल गायकवाड़ यांनी मृत महिलेची तपासणी केली. तपासणीनंतर सदर महिलेला मृत घोषित करण्यात आले. या घटनमूळे एका गरीब शेतमजूर कुटूंबाचा संसार उध्वस्त झाला आहे. ही दुःखद घटना सलगर बुद्रुकमध्ये वाऱ्यासारखी पसरली.या घटनेनेनंतर सलगर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

रस्ता अरुंद असल्यामुळे या रस्त्याबाबत वारंवार तक्रार दाखल करूनही सामाजिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केले आहे. तसेच या रस्त्याबाबत अखिल भारतीय छावा संघटनेने 19 नोव्हेंबर रोजी रास्ता रोखो करून आंदोलन करण्याचे आवाहन केले असून सदर रस्त्याबाबत दुर्लक्ष केले जात आहे अजून हा रस्ता किती जणांचा बळी घेणार असे नागरिकांतून व्यक्त करीत आहे.

सदर रस्त्याबाबत 'सकाळ' च्या सदराखाली बातमी प्रसिद्धी करूनही हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Web Title: The woman was killed ina accident