वाळुच्या भरधाव डंपरने महिलेला चिरडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

टाकळी ढोकेश्वर (नगर) : कान्हुर पठार (ता.पारनेर) येथील मुख्य चौकात बेकायदा वाळुची वाहतुक करणाऱ्या डंपरने महिलेस धडक देऊन चिरडले आहे. त्यामध्ये तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सोनाली किरण गोपाळे
(वय 23) रा.(कर्जुले हर्या ता.पारनेर) असे मृत महिलेचे नाव आहे.

टाकळी ढोकेश्वर (नगर) : कान्हुर पठार (ता.पारनेर) येथील मुख्य चौकात बेकायदा वाळुची वाहतुक करणाऱ्या डंपरने महिलेस धडक देऊन चिरडले आहे. त्यामध्ये तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सोनाली किरण गोपाळे
(वय 23) रा.(कर्जुले हर्या ता.पारनेर) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोपाळे या एका विवाहासाठी कान्हुर पठार येथे बसने आल्या होत्या. बसने खाली उतरून नगरकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसकडे जात असताना टाकळी ढोकेश्वर वरून भरदाव वेगाने येणाऱ्या वाळुच्या डंपरने त्यांना जोरात धडक देऊन त्यांना चिरडले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना त्वरीत ग्रामस्थांनी टाकळी ढोकेश्वर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.

गाडीचे मागील चाके अंगावरून गेल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात सुरू होता. त्यामुळे त्यांना रूग्णवाहिकेतुन नगर येथील रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यांचा काल सायंकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

यावेळी ग्रामस्थांनी वाळु वाहतुक करणाऱ्या चालकास पकडण्याचा प्रयत्न केला पंरतु तो पळुन गेला गाडीमधील असलेल्या किल्नरला गावातील ग्रामस्थांनी पकडुन ठेवले. त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता घटनास्थळी असलेल्या लोकांनी गाडीची हवा सोडुन दिली व याची माहिती पारनेर पोलीस ठाण्यात दिली. मात्र पोलीस येण्याच्या आधीच वाळु वाहतुक करणाऱ्या तरूणांनी गाडी व क्लिनरला पळवुन नेले. टाकळी ढोकेश्वर येथुन बेकायदा वाळु वाहतुक करणारे डंपर, ट्रक हे जोरदार वेगात जा-ये करतात त्यांना कोणाची भीती तर वाटत नाही आणि त्यांच्यावर कारवाई ही होत नाही.

गतिरोधक बसविण्याची मागणी...
टाकळी ढोकेश्वर वरून कान्हुर पठारकडे येताना तीव्र उताराचा रोड आहे त्यामुळे येणारी वाहणे ह्यांचा वेग जोरात असतो कान्हुरच्या मुख्य चौकात नेहमी गर्दी असते त्यामुळे अपघात होतात या ठीकाणी दोन्ही बाजुस गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

Web Title: womean rushed by dumper