चहात गुंगीचे औषध टाकून विवाहितेवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

पारनेर - एका 28 वर्षीय विवाहित महिलेस चहामधून गुंगीचे औषध देऊन तिचे विवस्त्र फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत एकाने सात महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार केला. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून मच्छिंद्र ज्ञानदेव जाधव (रा. कोहकडी) याच्याविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव याने गतवर्षी ऑक्‍टोबरमध्ये पीडित महिलेस फोन करून, तुझ्या पतीचा शिरूर बाह्यवळण रस्त्यालगत अपघात झाला असल्याचे खोटे सांगितले व तिला शिरूरला बोलावून घेतले. तेथे तिला चहातून गुंगीचे औषध टाकून तिला शिरूर येथील एका लॉजवर नेले. तेथे तिचे विवस्त्र फोटो काढून तिच्यावर अत्याचार केले.
Web Title: women Atrocity crime