महिलेची झाली रुग्णवाहिकेतच प्रसूती

सुदर्शन हांडे
बुधवार, 16 मे 2018

बार्शी : मळवंडी (ता.बार्शी) येथील अत्यवस्थ महिलेला रुग्णालयाकडे घेऊन जाताना महिलेची प्रसूती १०८ या रुग्णवाहिकीतच रस्त्याच्या कडेला करण्यात आली. वेळीच रुग्णाच्या मदतीला धावलेल्या रुग्णवाहिकेमुळे आणि रुग्णवाहिकेतील डॉ. क्षमा हंडीबाग यांच्या उपचाराने बाळासह महिलेचेही प्राण वाचले. 

सोमवारी (ता.१५) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास १०८ या हेल्पलाईन कॉल सेंटरवरून बार्शीतील रुग्णवाहिकेला इमर्जन्सी कॉल आला. 

मालवंडी येथील रुग्णालयात तात्काळ मदतीची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. कॉल येताच १०८ रुग्णवाहिकेसह पायलट गणेश काळे व डॉ.क्षमा हंडीबाग यांनी लगेचच मालवंडी गाव गाठले. 

प्रसूती कळा येत असलेल्या कल्पना अजित दुधाळ यांची अवस्था नाजूक होती. डॉ.क्षमा हंडीबाग यांनी प्राथमिक तपासणी केली असता बाळाचे डोके बाहेर आले होते आणि बाळ मध्येच अडकले होते. मालवंडी गावातच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डिलिव्हरी शक्य होती. पण बाळ व मातेवर उपचार शक्य नव्हते. मळवंडी ते बार्शी अंतर जास्त आहे. बार्शीपर्यंत जाण्यात वेळ लागेल याचा विचार करून मालवंडीपासून जवळ असलेल्या माढा येथे नेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 

माढा रोडने रुग्णवाहिका नेट असतानाच महिलेची अवस्था खूपच अस्वस्थ व नाजूक झाली. ही अवस्था पाहून डॉ क्षमा हंडीबाग यांनी गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून त्याच ठिकाणी महिलेची प्रसूती केली. परंतु जन्मलेली बाळ रडत नव्हते बाळ लगेच रडणे आवश्यक होते. ही अवस्था पाहून डॉ.क्षमा हंडीबाग यांची काळजी आणखी वाढली होती.

त्यांनी लगेच बाळाला कार्डियाक मसाज, स्टिम्युलेट, ऑक्सिजन देऊन उपचार सुरूच ठेवले. याचवेळी माढा येथील खाजगी रुग्णालयात संपर्क करून बालरोगतज्ज्ञांना घटनेची माहिती दिली. जन्मलेल्या बाळाची अवस्था ही खूपच अत्यावस्थ होती. अपुरे मनुष्यबळ व अपुरी साधन सामुग्री अशा परिस्थितीत डॉ.क्षमा हंडीबाग यांनीही प्रयत्न सोडले नाहीत. १०८ रुग्णवाहिकेत चालत्या गाडीत बाळावरील प्राथमिक उपचार कमी आले. १० मिनिटांत रुग्णवाहिका येथे पोहोचेपर्यंत बाळ रडायला लागले. 

रस्त्यातच प्रसूती झालेल्या आईला व बाळाला माढ्यातील डॉ.आडकर यांच्या सुयश दवाखान्यात दाखल करण्यात आले. पुढील उपचाराने माता व बाळ दोघांची प्रकृती उत्तम आहे. अपुरे मनुष्यबळ, अपुरी साधनसामुग्री, निर्मनुष्य रस्ता आणि हाताबाहेर गेलेली परिस्थिती आशा वेळी १०-१२ मिनिट जरी अजून मदत मिळण्यास उशीर झाला असता तर बाळाच्या व मातेच्या जीविताला धोका अशा कठीण वेळी केवळ डॉ.क्षमा हंडीबाग यांनी १०८ च्या रुग्णवाहिकेतून केलेले अविरत प्रयत्न यामुळे बाळ आणि महिला सुखरुप राहिले आहेत. 

Web Title: women delivery in ambulance