सांगली महापालिकेत महिलाराज; सातपैकी पाच सभापती महिला

सांगली महापालिकेत महिलाराज; सातपैकी पाच सभापती महिला

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेत आजपासून महिलाराज
सुरु झाले. एकूण सात समित्यांपैकी पाच सभापतीपदी महिलांची निवड झाली.
स्थायी समिती सभापतिपदी अजिंक्‍य पाटील विजयी झाले. तर समाजकल्याण
सभापतिपदी स्नेहल सावंत आणि महिला बाल कल्याण सभापतीपदी मोहना ठाणेदार
विजयी झाल्या.

सदस्यांच्या संख्याबळानुसार भाजपने प्रमुख तीन समित्यांसह सातपैकी सहा समित्यांचे सभापतीपद पटकावले. प्रभाग समिती तीनच्या सभापतीपदी कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या रईसा रंगरेज विजयी झाल्या.

महापौरांसह सहा महिलांचे राज्य आता महापालिकेवर आले आहे. निवडीनंतर विजयी
सभापतींच्या समर्थकांनी महापालिकेसमोर गुललाची उधळण करत जल्लोष केला. महापालिकेच्या सातही समित्यांच्या सभापतींची निवड आज झाली.

निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी काम पाहिले. तर सहाय्यक म्हणून नगरसचिव कल्लाप्पाणा हळींगळे यांनी काम पाहिले.

महापालिकेत भाजपचे संख्याबळ 42 आहे. तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे संख्याबळ 35 आहे. स्वाभिमानी आघाडीचे नगरसेवक विजय घाडगे गैरहजर होते. यानिवडीत सत्ताधारी भाजप विरुध्द कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी असा सरळ सामना झाला.
नूतन सभापतींचा सत्कार भाजपकडून विजयी झालेले नूतन सभापती अजिंक्‍य पाटील, मोहना ठाणेदार, स्नेहल सावंत, उर्मिला बेलवलकर, जगन्नाथ ठोकळे व शांता जाधव यांचा आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सुर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर, नगरसेवक शेखर
इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, सुरेश आवटी उपस्थित होते. प्रभाग समिती
तीनच्या सभापतीपदी विजयी झालेल्या राष्ट्रवादीच्या रईसा रंगरेज यांचा सत्कार विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर व राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी केला.


शहराची चांगली ओळख निर्माण करू : अजिंक्‍य पाटील
""भाजपच्या नेत्यांनी स्थायीसारख्या महत्वाच्या समितीवर सभापती म्हणून कामाची संधी दिली आहे. भाजपचा कारभार पारदर्शक होणार यात शंका नाही. पक्षभेद न करता सर्वांना एकत्र घेऊन विकासकामे केली जातील. तीनही शहरांना चांगली ओळख देण्याचा प्रयत्न करु. ड्रेनेज, पाणीपुरवठा योजना पूर्ण करून शहराचा चेहरा-मोहरा बदलला जाईल. आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवू.''

कुपवाड ड्रेनेजसाठी पाठपुरावा करणार : रईसा रंगरेज
""महापालिकेच्या प्रभाग समिती तीनच्या सभापतीपदाची संधी मिळाली आहे. कुपवाडचा सर्वांगीण विकास करण्यावर भर राहील. ड्रेनेज योजना मंजुरीसाठी पाठपुरावा केला जाईल. प्रभाग समिती तीनमधील सर्व वॉर्डात पिण्याचे पाणी, गटारी, रस्ते, क्रीडांगणे विकासासाठी प्रयत्न करणार. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी पाठपुरावा करणार आहे.''

समितीनिहाय उमेदवारांना पडलेली मते
समिती भाजप आघाडी
स्थायी अजिंक्‍य पाटील 9 मनोज सरगर 7
महिला बाल कल्याण मोहना ठाणेदार 9 मदिना बारुदवाले 7
समाजकल्याण स्नेहल सावंत 7 योगेंद्र थोरात 4
प्रभाग समिती 1 उर्मिला बेलवलकर 13 शुभांगी साळुंखे 6
प्रभाग समिती 2 जगन्नाथ ठोकळे 12 आरती वळवडे 8
प्रभाग समिती 3 सोनाली सागरे 5 रईसा रंगरेज 10
प्रभाग समिती 4 शांता जाधव 12 स्वाती पारधी 11

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com