महिलांना मिळणार निर्भया पथकाकडून तात्काळ मदत

हेमंत पवार  
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

कऱ्हाड : अनेकदा महिला, तरुणी यांना छेडछाडीचा अनुभव येतो. त्यांना तक्रारही द्यायची असते. मात्र पोलिस ठाण्याची पायरी चढायची म्हटले की, त्यांच्या मनात भितीची पाल चुकचुकते. त्यामुळे तक्रार दिली जात नाही. त्यासाठी कऱ्हाड शहर पोलिसांच्या निर्भया पथकानेच दोन पावले पुढे टाकुन महिला, तरुणी, त्यांचे पालक यांना अशा घटनांचा अनुभव आल्यास त्यांनी आता फक्त घरबसल्या फक्त व्हॉटसअपवर फोटो, व्हीडीओ, एसएमएसव्दारे माहिती द्यायची आहे. त्यांना तात्काळ निर्भया पथकाकडुन त्यांचा नंबर गोपनीय ठेवुन मदत मिळणार आहे.

कऱ्हाड : अनेकदा महिला, तरुणी यांना छेडछाडीचा अनुभव येतो. त्यांना तक्रारही द्यायची असते. मात्र पोलिस ठाण्याची पायरी चढायची म्हटले की, त्यांच्या मनात भितीची पाल चुकचुकते. त्यामुळे तक्रार दिली जात नाही. त्यासाठी कऱ्हाड शहर पोलिसांच्या निर्भया पथकानेच दोन पावले पुढे टाकुन महिला, तरुणी, त्यांचे पालक यांना अशा घटनांचा अनुभव आल्यास त्यांनी आता फक्त घरबसल्या फक्त व्हॉटसअपवर फोटो, व्हीडीओ, एसएमएसव्दारे माहिती द्यायची आहे. त्यांना तात्काळ निर्भया पथकाकडुन त्यांचा नंबर गोपनीय ठेवुन मदत मिळणार आहे. निर्भया पथकाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधुन महिला, तरुणींच्या सुरक्षीततेसाठी निर्भया पथकाचे हे महत्वकांक्षी पाऊल ठरणार आहे. 

महिला, तरुणींच्या छेडछाडीच्या घटनांत अलिकडे वाढ झाली आहे. अशा घटना दररोज घडु लागल्या आहेत. अशा प्रवृत्तीविरोधात कारवाई करण्यासाठी आणि महिला, मुली, तरुणींच्या मदतीसाठी पोलिसांनी निर्भया पथकाची स्थापना केली आहे. जेथे भय तेथे निर्भया हे ब्रिदवाक्य घेवुन स्थापन करण्यात आलेल्या या पथकाच्या कारवाईने चांगलाच दबदबा निर्माण झाला आहे. पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे, शहर पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या या पथकाचे पोलिस उपनिरीक्षक रुपाली चव्हाण, हवालदार रेखा देशपांडे, विनया वाघमारे, वैशाली कटरे या काम पहात आहेत. त्या पथकाव्दारे अशा पीडीत महिला, तरुणींना मदत देण्याची कार्यवाही केली जाते.  

आत्तापर्यंत अनेकांना या पथकाने मदत केली आहे. निर्भया पथकाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधुन अशा अन्यायग्रस्त महिला, मुली, तरुणींना, त्यांच्या पालकांना मदत मिळावी या उद्दात हेतुने निर्भया पथकाने दोन पावले पुढे टाकुन त्यांनी ८३०८४६३१०० व ९९२३१०२३६८ या व्हाॅटसअपवर घसबलल्या त्रास देणाऱ्या टोळक्याची, तरुणांची माहिती, फोटो, छोटासा व्हीडीओ किंवा एसएमएस पाठवायचा आहे. ती माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवुन त्यांना संबंधित ठिकाणी तातडीने निर्भया पथकाव्दारे मदत देण्यात येणार आहे

Web Title: women get quick help from nirbhaya squad