अस्वलाच्या हल्यात चंदगड तालुक्यात महिला गंभीर जखमी

अस्वलाच्या हल्यात चंदगड तालुक्यात महिला गंभीर जखमी

चंदगड - कलिवडे (ता.चंदगड) पैकी धनगरवाड्यावरील सुनीता धाऊ जानकर (वय 35) या अस्वल आणि त्याच्या दोन पिल्लांनी केलेल्या हल्यात गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सौ. जानकर घराच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत गवत कापत होत्या. त्याच वेळी पाठीमागून अस्वल आणि त्याच्या दोन पिल्लांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या चेहऱ्यावर, खांद्यावर, छातीवर व पोटावर नख्यांनी ओरबाडल्यामुळे गंभीर जखमा झाल्या आहेत. मांडीचा चावा घेतला आहे. डाव्या खांद्याचे हाड मोडून गंभीर दुखापत झाली आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने त्यांना चंदगड येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, वनपाल बाळासाहेब भांडकोळी यांनी दवाखाण्यात जाऊन विचारपूस केली.

जानकर यांच्या खांद्याचे हाड मोडले असून दोन दिवसात शस्त्रक्रीया करणार असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. दरम्यान शेणाच्या गायरीवरील किडे आणि वाळवी हे अस्वलाचे खाद्य असून ते खाण्यासाठी अस्वले येतात. त्यापासून सावधानता बाळगावी असे आवाहन वन विभागाने केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com