मंगळवेढा : महिला आघाडी आणि शिवसैनिकांचा प्रशासनाच्या चालढकली विरोधात ठिय्या

women leaders and Shivsainiks agitation against government ignorance at Mangalwedha
women leaders and Shivsainiks agitation against government ignorance at Mangalwedha

मंगळवेढा : दक्षिण भागातील दुष्काळी गावांसाठी मंजूर असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता व बजेटमध्ये निधीच्या तरतूदीसाठी प्रशासनाकडून होत असलेल्या चालढकलीच्या विरोधात महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी शिवसैनिक व शेतकऱ्यांसोबत नंदेश्वर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. गोडसे यांच्या आंदोलनामुळे केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा-शिवसेना युतीला आव्हान ठरले आहे.

या आंदोलनामध्ये शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे, शहर प्रमुख सुनील दत्तू, रामा गरंडे, तुकाराम गरंडे, संभाजी खापे, दत्ता कळकुंबे, आप्पासाहेब शिर्के, अंबादास शिंदे, विजय सलगर, उमेश क्षीरसागर, दत्ता बंडगर, सुशीला सलगर, आरती बसवंती, शारदा जावळे, अर्चना भालेराव यांचेसह अनेक शेतकरी व शिवसैनिक सहभागी झाले.

वर्षानुवर्षे या भागातील शेतकरी पाणी मिळण्याच्या आशेवरील या भागातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली त्यात प्रशासनाने चालढकल होत राहिली. या योजनेसाठी गेल्या वर्षभरापासून गोडसे यांनी आ. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून विविध पातळीवर पाठपुरावा केला आहे. परंतु प्रशासनाकडून म्हणावी तशी कार्यवाही होताना दिसत नाही. म्हणूनच या योजनेवर आवाज उठविण्यासाठी गोडसे यांनी शिवसैनिक व शेतकऱ्यांसोबत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. दरम्यान उजनी कालवा वि. क्र. 9 चे उपकार्यकारी अभियंता मनोज पंडित यांनी सदर आंदोलनाला भेट दिली. प्रशासनाच्या आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. पण सक्षम अधिकाऱ्याने ठोस लेख आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन स्थगित न करण्याचा निर्णय शिवसैनिक व शेतकऱ्यांनी घेतला.

राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे, मल्हार महासंघ तालुकाध्यक्ष अंकुश गरंडे, लोहार संघटनेचे तालुकाध्यक्ष बंडू लोहार या आंदोलनस्थळी येऊन जाहीर पाठिंबा दिला. 

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देवून स्थगित करण्याची आंदोलकांना विनंती केली असता ठोस लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन स्थगित न करण्याचा आंदोलकांनी निर्णय घेता. तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणार आहोत.
- मनोज पंडित, उपकार्यकारी अभियंता, उजनी कालवा वि. क्र. 9 मंगळवेढा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com