महिलेने केले बिबट्याशी दोन हात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

बाजार भोगाव - पडसाळी (ता. पन्हाळा) येथील लघुपाटबंधारे प्रकल्पानजीक बिबट्याने बैलावर हल्ला चढवून त्याच्या मागील पायाचा लचका तोडला. बैलाच्या राखणीसाठी आलेल्या बाळाबाई विठ्ठल पाटील यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याचा दगडधोंड्यांनी समाचार घेत त्याला पळवून लावले. तथापि जंगलाकडे जाता जाता बिबट्याने कोलिक (ता. पन्हाळा) येथे गाईवरही हल्ला चढवला. ही घटना शनिवारी (ता. १८) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.

दरम्यान, बिबट्याच्या वावरामुळे कोलिक, गोठणे, वाशी, पडसाळी परिसरात घबराट पसरली आहे. मानवाडच्या वनपाल स्मिता डाके, वनरक्षक सुनील कांबळे, नाथा कांबळे, आकाराम पाटील, हिंदूराव पाटील यांनी घटनेचा पंचनामा करून परिक्षेत्र कार्यालयास अहवाल पाठवला आहे. संबंधित बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी कोलिकच्या दत्ता पाटील यांनी केली आहे.

Web Title: Women Leopard