दारुबंदीसाठी गावच्या महिलांनीच घेतला पुढाकार

हुकूम मुलाणी 
गुरुवार, 29 मार्च 2018

मंगळवेढा - तालुक्यातील जालीहाळमध्ये बेकायदेशीरित्या होणाऱ्या दारु विक्री विरुध्द महिलांनीच पदर खोचला. ग्रामपंचायतीने घेतलेल्या विशेष ग्रामसभेत दारुबंदी करावी म्हणून हातवर करुन समर्थन केले. दरम्यान, या विशेष ग्रामसभेत दारुबंदीचे समर्थन का केले यावरुन पतीने पत्नीला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्यांची घटना घडली. परंतु, पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी केली.

ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या विशेष ग्रामसभेस सहायक पोलिस निरीक्षक महेश विधाते, सरपंच सचिन चौगुले, मायाप्पा गावडे, हणमंत कांबळे, उत्तम कांबळे ग्रामसेवक अभिजित लाड यांच्यासह गावातील महिलांची उपस्थिती मोठया प्रमाणात होती. तालुक्यातील दुष्काळी असलेल्या जालीहाळमध्ये रोजगाराचे कोणतेही साधन नाही. मजुरीसाठी महिलांना पंढरपूर तालुक्यात जावे लागते. तर गाळप हंगामात ऊसतोडणीस पतीसोबत जावे लागते. त्यातच गावात दारुची व्रिकी मोठया प्रमाणात केली जात असल्यामुळे गोरगरीब महिलांचे संसार उध्दवस्त होत आहे. घरातील कर्ता पुरुष दारुच्या आहारी गेल्यामुळे कुटुंबाचा भार महिलांवर पडत आहे. दारुसाठी शेजारच्या गावातील मदयपी देखील येवू लागले आहेत. त्यामुळे गावातील शांतता बिघडल्याचे महिलांचे म्हणणे आहे.

दारुबंदी करावी यासाठी महिलांनी मागणी केल्यामुळे विशेष ग्रामसभा घेवून बंदीबाबतचा ठराव महिलांनी मांडला. तो आम्ही एकमताने मंजूर केला आहे.
- सचिन चौगुले सरपंच 

महिलांच्या मागणीनुसार विक्री बंद करण्याच्या सुचना दिल्या असून, विक्री केल्यास विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल. उपस्थित महिलांकडे माझा मोबाईल क्र दिला आहे. तसेच दारुविक्री करताना अढळल्यास याबाबत तात्काळ संपर्क करण्यास सांगितले आहे. बंदीची अमंलबजावणी काटेकरपणे केली जाईल 
- महेश विधाते सहायक पोलीस निरीक्षक

Web Title: Women from mangalwedha village vote for no-liquor zone