अल्पसंख्याक उद्योजक महिलांच्या प्रगतीसाठी बचत गटांचा हातभार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

कऱ्हाड : अल्पसंख्याक उद्योजक महिलांची प्रगती केवळ आर्थिक व कौशल्य नसल्याने खुंटली आहे. अल्पसंख्याक महिला उद्योजकांची पिछेहाट होत आहे. ते हेरून अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील महिलांचे उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी बचत गटाचा हातभार लागणार आहे.

कऱ्हाड : अल्पसंख्याक उद्योजक महिलांची प्रगती केवळ आर्थिक व कौशल्य नसल्याने खुंटली आहे. अल्पसंख्याक महिला उद्योजकांची पिछेहाट होत आहे. ते हेरून अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील महिलांचे उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी बचत गटाचा हातभार लागणार आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटांना पतपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे अल्पसंख्याक महिला उद्योजक आर्थिक सक्षम होण्यास शासनाची साथ मिळणार आहे. अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील महिलांच्या उद्योजक कौशल्याला वाव मिळावा, यासाठी अल्पसंख्यांक महिलांच्या स्वंयसहायता बचत गट स्थापन करण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून अल्पसंख्याक महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठीची पाऊले उचलली जाणार आहेत. शासनाने त्यासाठी दोन कटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात एक कोटी 40 लाखांचा निधी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून वितरीत करण्यात येणार आहे.

राज्याभरातील अल्पसंख्याक बहुलभागात दोन हजार चारशे बचत गट स्थापण्याचे उद्धीष्ठही आहे. या बचत गटांना मॉनरेटींग करण्यासाठी 13 लोकसंचलीत साधन केंद्र स्थापना करण्याच्या हालचाली सुरू आहेत. शासनाने आठ वर्षाच्या कालवधीत तेराही लोकसंचीलत साधन केंद्र प्रत्यक्षात सुरू करायाची आहेत. त्यासाठी 27 कोटी 54 लाख 32 हजार 600 रूपयांची तरतूद शासनाने केली आहे. मात्र तो निधी टप्प्या टप्प्याने दिला जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी दोन कोटींच्या निधीची तरतूद आहे. त्यात पहिल्या टप्प्यासाठी एक कोटी 40 लाख रूपयांची तरतूद महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे करण्य़ात आली आहे. बचत गट स्थापन करण्याचे पहिल्या टप्प्यातील काम बारा जिल्ह्यात होत आहे. 

योजनेतील महत्वाचे 
- डिसेंबर 2018 पर्यंत प्रत्यक्षात एक कोटी 40 लाखांचा निधी वितरणासाठी उपलब्ध 
- लाभार्थी महिलांसाठीचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक विकास महामंडळाने देणे बंधनकारक 
- अल्पसंख्याक महिलांच्या उद्योजकतेला वाव देण्यासाठी शासनाचा पुढाकार
- आठ वर्षाच्या कालावधीत तेरा लोकंचलीत साधन केंद्राची होणार उभारणी 
- 27 कोटी 54 लाख 32 हजार 600 रूपयांची आठवर्षाच्या कालवधीसाठी तरतूद

Web Title: women from minority helped by bachat gat