येणपेतील महिलेचा अत्याचार करून खून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

कऱ्हाड - येणपे येथे विवस्त्रावस्थेत आढळलेल्या महिलेवर अत्याचार करून तिचा गळा आवळून खून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. तिच्या गळ्यातील 25 हजारांचे दागिनेही संशयितांनी चोरले आहेत. येणपेच्या माळरानात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह करण शंकर कोळी (वय 22, रा. ओकोली, ता. शिराळा) यास अटक करण्यात आली आहे. संशयितांनी बलात्कार केल्यानंतर या महिलेचा गळा आवळून खून केला, अशी माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकारांना दिली. या वेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढेवळे व पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर उपस्थित होते. 

ही महिला तिच्या शेतातून घरी निघाली होती. संशयित करण कोळी तिच्या आजोळचा आहे. ताब्यात घेतलेला अल्पवयीन मूळचा येणपे येथील आहे. घटनेनंतर अवघ्या चोवीस तासांच्या आत पोलिसांनी छडा लावला. काल रात्रभर चौकशी केल्यानंतर संशयितांनी खुनाची कबुली दिली. पोलिसांनी सांगितले, सकाळी या महिलेचा मृतदेह विवस्त्रावस्थेत सापडला होता. उत्तरीय तपासणीत तिचा गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याआधीच ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांकडे कसून चौकशी केली. त्यांनी बलात्कारासह खुनाची कबुली दिली. 

पोलिस अधीक्षक देशमुख म्हणाले, ""करण कोळी याचे शिराळा तालुक्‍यातील ओकोली हे मूळ गाव आहे. मात्र, रोजंदारीनिमित्त तो साकुर्डी येथे राहतो. त्याने संबंधित महिलेचे शेत जेथे आहे, त्याच्या शेजारच्या रानातील झुडपे कापली होती. त्याचे पैसे घेण्यासाठी तो तेथे गेला होता. त्या वेळी ही महिला तेथून जात होती. त्या वेळी कोणी नाही, हे पाहून त्यांनी हे कृत्य केले. अधिक तपास सुरू आहे. गुन्ह्याची व्याप्ती व प्रकार पाहून तपास पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्याकडे वर्ग केला आहे.''

Web Title: women murder in karad