आता महिला ग्राम सुरक्षा दल; पोलिस निरीक्षकांनी दिली माहिती

राजकुमार शहा 
रविवार, 1 एप्रिल 2018

सध्या ग्रामिण भागात चोऱ्या तसेच विविध अवैध व्यवसायाचे वाढते प्रमाण आहे. रोख रक्कम सोने चांदी यासह डाळींब कांदा या सारख्या पिकाचा चोरीत समावेश आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी पोलिस पोहोचणे शक्य नाही. मात्र घडणाऱ्या घडामोडीची वेळेत माहिती मिळावी यासाठी ग्राम सुरक्षा दलाचा उपयोग होत आहे.

मोहोळ : गावच्या सुरक्षेसाठी तसेच गावातील अवैध व्यवसाय बंद व्हावेत यासाठी सध्या गावोगावी युवकांचे ग्राम सुरक्षा दल कार्यरत आहे. त्याच धर्तीवर आता महिला ग्राम सुरक्षा दल शहरातील प्रभागासह प्रत्येक गावात स्थापन करावेत असा शासनाचा आदेश नुकताच पारित झाला असल्याची माहिती मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली. या आदेशामुळे आता मालिकांना अवैध व्यवसाया विरोधात पदर खोचण्याची मोठी संधी मिळणार आहे.

सध्या ग्रामिण भागात चोऱ्या तसेच विविध अवैध व्यवसायाचे वाढते प्रमाण आहे. रोख रक्कम सोने चांदी यासह डाळींब कांदा या सारख्या पिकाचा चोरीत समावेश आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी पोलिस पोहोचणे शक्य नाही. मात्र घडणाऱ्या घडामोडीची वेळेत माहिती मिळावी यासाठी ग्राम सुरक्षा दलाचा उपयोग होत आहे. मोहोळ तालुक्यातील 73 गावात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या प्रबोधनासाठी मोहोळ येथे नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली. त्यात निर्भया पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक विक्रम बोधे यांनी मार्गदर्शन केले. 

याच धर्तीवर आता शहरात प्रभागनिहाय तर ग्रामिण भागात गाव निहाय माहिला ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्याचा आदेश शासनाने नुकताच पारित केला आहे. प्रत्येक प्रभागात व गावात दहा महिलांचा एक गट असणार आहे. त्यांनी गावातील दारू मटका जुगार या बेकायदा व्यवसायाला आळा घालावयाचा आहे. युवक व माहिला ग्राम सुरक्षा दलावर पोलिस पाटलाचे नियंत्रण राहणार आहे. त्यासाठी पोलिस पाटलांना एक रजिस्टर देण्यात येणार असुन त्यात त्यांनी ग्राम सुरक्षा दलाच्या कामाच्या नोंदी अद्यावत ठेवावयाच्या आहेत. लवकरच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मस्के यांनी सांगितले. 

Web Title: women security squad in mohol