जतमध्ये तीन मुलांसह विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या

जतमध्ये तीन मुलांसह विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या

जत - शहरातील राधिका सुभाष कोळी (वय ३०) या विवाहितेने आपल्या तीन मुलांसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. 

घरगुती वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत  आहे. प्रज्वल सुभाष कोळी (वय 3), आराध्या सुभाष कोळी (वय 2) आणि हर्षल सुभाष कोळी (वय 4) महिने अशी मुलांची नावे आहेत. दसऱ्या दिवशी रात्री किरकोळ करणातून पती पत्नीत वाद झाला होता. रात्री उशिरा राधिका आपल्या मुलांना घेऊन घराबाहेर पडली. हे समजताच नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला. पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. शुक्रवारी पहाटे हर्षलचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. त्यानंतर राधिकाने मुलासह आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. दुपारी 12 वाजता सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com