महिलांचा सुखधान यांच्या निवास्थानासमोर ठिय्या

सुनील गर्जे 
शनिवार, 1 डिसेंबर 2018

सुखधान यांच्या डोळ्यात अश्रू... 
आंदोलन करणार्या महिलांना चहा-पाणी विचारना करत असतांना महिलांनी रडत “आम्हाला काहीच नको फक्त आमच्यासाठी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्या” असे म्हणताच सुखधान यांनीही आपल्या अश्रूनां वाट मोकळी करून दिली.

नेवासे : नगरसेविकापदाचा राजीनामा देवू नका या मागणीसाठी प्रभाग दोनसह  
शहरातील शेकडो महिला, नागरिकांसह विद्यार्थ्यांनी आज शुक्रवारी नगरसेविका शालिनी  सुखधान व कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखधान यांच्या निवास्थानासमोर तब्बल दोनतास ठिय्या आंदोलन केले.

संजय सुखधान यांनी बुधवारी नेवाशात पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष, उपाध्यक्षासह सर्व नगरसेवकांवर टक्केवारीचे गंभीर आरोप करत पत्नी शालिनी यांच्या राजीनाम्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज दुपारी महिलांसह नागरिकांनी सुखधान यांच्या निवासास्थानासमोर ठिय्या करत "राजीनामा देवू नका, तुमचा निर्णय मागे घ्या” अशा घोषणा दिल्या. यावेळी महिलांनी सुखधान यांना राजीनामा दिल्यास  
निवास्थाना समोरच उपोषण करू अशा इशार्याचे निवेदन दिले.  दरम्यान सुखधान  
यांच्या "तुमच्या मागणीचा विचार करू या आश्वासनानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

सुखधान यांच्या डोळ्यात अश्रू... 
आंदोलन करणार्या महिलांना चहा-पाणी विचारना करत असतांना महिलांनी रडत “आम्हाला काहीच नको फक्त आमच्यासाठी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्या” असे म्हणताच सुखधान यांनीही आपल्या अश्रूनां वाट मोकळी करून दिली.

पाणी प्रश्न सोडला : हेमा सदाफळ  
"उन्हाळ्यात सुखधान यांनी स्वखर्चातून तीन महिने पिण्याच्या पाणी दिले. स्वच्छतेसाठी स्वताची घंटागाडी दिली. असे प्रभाग दोनच्या रहिवाशी हेमा सदाफळ म्हणाल्या. 

सुखधान आमचे आधार : मनीषा भोसे 
"मला वडील नाही, गारीबी आहे, सुखधान कुटुंबीयांमुळे माझे शिक्षण चालू आहे. माझ्यासारख्या अनेकांचे ते आधार आहे. त्यांनी राजीनामा देवू नये हि विनंती करण्यासाठी मी येथे आले. असल्याचे विद्यार्थिनी मनीषा भोसे म्हणाली.

Web Title: womens agitation in Newase