सोमवारी सोलापुरात 'सकाळ'तर्फे स्त्रीशक्तीचा जागर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मार्च 2019

सोलापूर : "सकाळ'ने आयोजिलेल्या "जागर स्त्री-शक्तीचा' या उपक्रमामुळे कुटुंबात निर्माण झालेला गॅप दूर होईल. महिला सक्षमीकरण होईल, अशा प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या आहे. येथील इंदिरा गांधी (पार्क) स्टेडियमवर 11 मार्च रोजी पहाटे सहा ते सकाळी नऊ या वेळेत स्त्रीशक्तीचा जागर कार्यक्रम होणार आहे. उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही मान्यवरांनी केले आहे. 

महिला सक्षमीकरण ही आजची गरज आहे. त्यादृष्टीने घेतलेला हा कार्यक्रम महिलांसाठी चांगला आहे. या कार्यक्रमात आई व मुलगी या दोघींनीही सहभागी होणे आवश्‍यक आहे. 
डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी. 

महिला सशक्तीकरणासाठी अशा कार्यक्रमाची गरज आहे. ज्या समाजातील महिला सक्षम असतात तो समाज सुदृढ झाल्याशिवाय राहात नाही. सोमवारी (ता. 11) होणाऱ्या कार्यक्रमासाठी आई व मुलगी या दोघींनीही उपस्थित राहावे. 
- डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद 

"सकाळ'ने आयोजिलेल्या उपक्रमामुळे सध्या कुटुंबात जो "गॅप' निर्माण झाला आहे, तो दूर होईल. विशेषतः आई आणि मुलीमधील संवाद दृढ होईल. हा उपक्रम निश्‍चितच परिणामकारक होणार आहे. 
- त्र्यंबक ढेंगळे-पाटील, उपायुक्त 
सोलापूर महापालिका 

"सकाळ'च्या माध्यमातून आयोजित केलेल्या स्त्रीशक्तीचा जागर या कार्यक्रमासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. या कार्यक्रमावेळी आईला सोबत आणून कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असल्याने विद्यार्थिनींत उत्साहाचे वातावरण आहे. स्मार्ट सोलापूर शहरात पहिल्यांदाच अशाप्रकारचा कार्यक्रम होत असल्याने साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे. 
- डॉ. कीर्ती पांडे, 
प्राचार्या, दयानंद वाणिज्य महाविद्यालय

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: womens day special program in solapur