अजितदादा पवार व हर्षदादीदी देशमुख- जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रंगला महिलांचा सन्मान सोहळा

रुपेश कदम
सोमवार, 23 जुलै 2018

मलवडी - माण ही रत्नांची खाण आहे. देश सुरक्षेसाठी तालुक्यातील अनेक जवानांनी आपले सर्वस्व अर्पण केले म्हणूनच आपण इथे सुखाने जगू शकलो. हे ऋण आपण आयुष्यभर लक्षात ठेवणे आवश्यक आहे असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच वीरपत्नी, वीरमातांसह त्यांच्या कुटुंबियांना यापुढील आयुष्य सन्मानानं जगता यावं यासाठी प्रभाकर देशमुख युवा मंच सदैव पुढाकार घेईल असे आश्वासनही त्यांनी दिले. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार तसेच माण व खटाव तालुक्यातील युवा नेतृत्व, के. जे.

मलवडी - माण ही रत्नांची खाण आहे. देश सुरक्षेसाठी तालुक्यातील अनेक जवानांनी आपले सर्वस्व अर्पण केले म्हणूनच आपण इथे सुखाने जगू शकलो. हे ऋण आपण आयुष्यभर लक्षात ठेवणे आवश्यक आहे असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच वीरपत्नी, वीरमातांसह त्यांच्या कुटुंबियांना यापुढील आयुष्य सन्मानानं जगता यावं यासाठी प्रभाकर देशमुख युवा मंच सदैव पुढाकार घेईल असे आश्वासनही त्यांनी दिले. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार तसेच माण व खटाव तालुक्यातील युवा नेतृत्व, के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा देशमुख–जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रभाकर देशमुख युवा मंचातर्फे सीमेवर लढताना वीरमरण आलेल्या माण तालुक्यातील शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, कुटुंबिय, अंगणवाडी सेविका, पोलिस कर्मचारी व परिचारिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. 

या कार्यक्रमास ड्रीम सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा प्रभाकर देशमुख, युवा नेते डॉ. संदीप पोळ, मनोज पोळ, सुनिल पोळ, सुभाष नरळे, पंचायत समितीचे सभापती पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे, जिल्हा परिषद सदस्या भारती पोळ व सोनाली पोळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे माण तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत, पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर, तानाजी कट्टे व कविता जगदाळे, तानाजी मगर, हेमंत निंबाळकर, योगिनी नरळे, माणदेश फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष प्रवीण काळे, रमेश शिंदे, प्रशांत विरकर, बालाजी जगदाळे, विविध गावाचे सरपंच, विविध क्षेत्रातील महिला व ग्रामस्थांची उपस्थिती होती. श्री देशमुख पुढे म्हणाले की, अंगणवाडी सेविका, महिला पोलिस कर्मचारी व परिचारकांची सेवा देखील असामान्य अशी आहे. भावी पिढी घडविण्यासह त्यांची सुरक्षा व सुश्रूषा करण्याचे काम त्या करत आहेत.

अजितदादांबद्दल बोलताना ते म्हणाले की वक्तशीर, सदैव मदतीसाठी तत्पर, सातत्याने जनसामान्यांचा विचार, कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेऊन सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहणारे अजित दादांसारखे नेतृत्व महाराष्ट्राला लाभावे. हर्षदा देशमुख यांना शुभेच्छा देताना ते म्हणाले तिला मायभूमीची ओढ आहे, इथल्या लोकांमध्ये ती चांगल्या रितीने मिसळते. मुले हीच आपली खरी संपत्ती आहे. त्यांच्यात वेळ आणि पैशांची गुंतवणूक करा असे सांगून त्यांनी हर्षदा यांच्या लहाणपणीच्या विविध आठवणी जागविल्या.

आपल्या वाढदिवसानिमित्त मनोगत व्यक्त करताना हर्षदा देशमुख म्हणाल्या की महिला सन्मानाचा एक आगळा-वेगळा कार्यक्रम आयोजित करुन प्रभाकर देशमुख युवा मंचने नवीन आदर्श घालून दिला आहे. माझ्यासाठी हा अविस्मरणीय सोहळा असून महिलांच्या सन्मानासाठी योगदान देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते राणंद येथील गजानन मारूती वाघमारे, पिंगळी येथील सदाशिव अण्णा जगदाळे, दहिवडी येथील दिनकर मारूती नाळे, सलीम गुलाब हवालदार, मसकरवाडी येथील सुनील विठ्ठल सुर्यवंशी, लोधवडे येथील निलेश पोपट जाधव, जाशी येथील चंद्रकांत शंकर गलंडे, मोही येथील नामदेव सोपान देवकर, बिदाल येथील शिवाजी जगदाळे. स्वरूपखानवाडी येथील आनंदराव गुलाबराव पिसाळ या शहीद जवानांच्या वीरमाता, वीरपत्नी व कुटुंबियांचा उचित सन्मान करण्यात आला.

किरकसालचे सरपंच अमोल काटकर यांनी केले. सुरज भोसले यांनी स्वागत केले तर पुजा सावंत हिने आभार मानले. हणमंत जगदाळे यांनी सुत्रसंचालन केले. समाजासाठी महत्वपुर्ण योगदान देणार्या पण दुर्लक्षित महिलांचा सन्मान केल्याबद्दल महिलांनी समाधान व्यक्त करीत युवामंचास धन्यवाद दिले. 

Web Title: Women's honors ceremony on the occasion of Ajitdada Pawar and Harshadadi Deshmukh - Jadhav's birthday