आंदोलनात महिलांचा सहभाग वाढला

किरण चव्हाण
मंगळवार, 31 जुलै 2018

माढा (सोलापूर ): मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी (ता. 31) माढा तालुक्यातील सकल मराठा समाजातील महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळयाची अंत्ययात्रा काढून तहसील कार्यालयासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले.

माढा तहसील कार्यलयासमोरील ठिय्या आंदोलनाचा मंगळवारी आठवा दिवस होता. सकाळी माढ्यातील सकल मराठा समाजातील महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळयाची अंत्ययात्रा काढली. यावेळी महिलांनीच तिरडीला खांदा दिला. महिलांनी आरक्षणाच्या मागणीच्या व सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तहसील कार्यालयाच्या प्रवेद्वारासमोर प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले.
मागील दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय रित्या वाढला आहे.

Web Title: Women's participation increased in Maratha agitation