स्वतःला सिद्ध करुन महिलांचा टक्का वाढवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

कोल्हापूर - बदलत्या जगात स्त्रियांनी स्वत:मध्ये इतका बदला केला आहे, की सर्वच क्षेत्रात त्यांचे अस्तित्त्व दिसत आहे. स्त्रियांचा हा टक्का वाढण्यासाठी आजच्या मुलींनी स्वत:ला कमी न समजता स्वत:ला सिद्ध करावे, असे आवाहन विविध महिला वक्‍त्यांनी आज येथे केले. निमित्त होते डिलिव्हरींग चेंज फाऊंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) सायबरमध्ये आयोजित ‘यिन संवाद’ कार्यक्रमाचे. प्रा. डॉ. एस. एस. शिरोळ अध्यक्षस्थानी होते. जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम झाला.  

लेफ्टनंट मीनल शिंदे-चव्हाण म्हणाल्या, ‘‘मला पोलिस व्हायचे होते. मात्र, शिक्षणाच्या प्रवाहात माझे ध्येय मोठे होत गेले. कुटुंबियांचे माझ्याकडे लक्ष असल्याने मी काय व्हावे, हे त्यांनी ठरवून टाकले. मी एमएनंतर कमांडिंग डिफेन्स सर्व्हिस परीक्षेची तयारी सुरू केली. अनेकांचा गैरसमज होता, की आर्मीमध्ये मुली जात नाहीत. पण, वडिलांचे पाठबळ, चांगल्या मित्र-मैत्रिणींमुळे मला योग्य सल्ले मिळाले. इंग्रजीवर प्रभुत्त्व मिळविण्यासाठी स्पोकन इंग्लिशच्या क्‍लासला प्रवेश घेतला आणि स्वत:ला सिद्ध करण्यासाठी झपाटून गेले.’’ 

सहायक पोलिस निरीक्षक आरती नांद्रेकर म्हणाल्या,‘‘करियरबाबत विवेकाचा चेतक जागृत ठेवून निर्णय घ्यायला हवा. मी माझे ध्येय ठरवले होते. विवाहानंतर पतीने खूप सपोर्ट केला. सासरच्या मंडळींनीही प्रोत्साहित केले.’’ 

स्मार्ट सोबतीच्या संपादक सुरेखा पवार म्हणाल्या, ‘‘मोदी साठाव्या वर्षी पंतप्रधान होऊ शकतात तर आपण आपल्या करियरची सुरवात केव्हाही करू शकतो. आपण जे करियर निवडणार आहोत, त्याची कल्पना आपल्या पालकांना द्यायला हवी. तर तेही आपल्याला पाठिंबा देत वेळोवेळी मदत करतील.’’

या वेळी महाराष्ट्र राज्य यिन महामंडळाचा अध्यक्ष सुशांत पाटोळे, ऋतुजा साळोखे, कौस्तुभ यादव, शर्वरी इंगवले, सुनील रणदिवे, विनायक शेटे, आकाश पुरेकर, अभिषेक श्रीराम, श्‍वेता देवळेकर, आकाश पांचाळ, वैभव बुरूड, आकांक्षा नीळकंठ, राधिका बेलवलकर, मयूर गडकर यांचा सत्कार झाला. या प्रसंगी प्रा. दीपक भोसले, प्राचार्या डॉ. विद्या साळोखे, प्रा. अश्‍विनी रायबागकर, प्रा. आदर्श चव्हाण, प्रा. बेला जोशी उपस्थित होते. यिन समन्वयक सूरज चव्हाण यांनी आभार मानले.

Web Title: womens percentage increase