जलसंधारणाच्या कामात 'सकाळ'चे काम कौतुकास्पद: भारत भालके 

solapur
solapur

सलगर बुद्रुक (सोलापुर) -  सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळी परिस्थिवर मात करण्यासाठी राज्यभर वेगवेगळ्या माध्यमातून जलसंधारणाची कामे झाली आहेत. आशा कामात सकाळ माध्यम समुहाने जलसंधारणाच्या कामात झोकुन दिले आहे. पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजमनातील गाळ काढण्याबरोबरच तलावातील गाळ काढण्याचे काम सकाळने हाती घेतले असून त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे असे मत आमदार भारत भालके यांनी मांडले. 

सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत तालुक्यात नंबर आल्यामुळे या कामात मदत करणाऱ्या व्यक्ती व संस्थाचा गौरव करण्यासाठी आसबेवाडी ग्रामपंचायत व आसबेवाडी विकास फांउडेशन यांच्या मार्फत कृतदन्यता सोहळा आयोजित केला होता यावेलेस आमदार भालके हे बोलत होते. 

यावेळी अतिरिक्त जिल्ह्या अधिकारी रामचंद्र शिंदे, माजी पंचायत समिति सभापती संभाजी गावकरे, सकाळचे सहयोगी संपादक अभय दीवानजी, रतनचंद्र बेंकेचे अध्यक्ष राहुल शहा, पंचायत समितीचे गटनेते नितिन पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरेश कोलेकर, पंढरपुरचे युवा नेतृत्व प्रणव परिचारक, तहसीलदार अप्पासाहेब समींदर, तालुका कृषी अधिकारी नामदेव गायकवाड,पुणे येथील आरटीओ इंनस्पेक्टर शिवाजीराव माने,उद्योजक दामाजी आसबे व बाळासाहेब आसबे, शिक्षक नेते सुरेश पवार, कृषी पर्यवेक्षक संभाजी शेनवे, गुलाब थोरबोले, सुहास पवार, पोलिस पाटील महेश आसबे, भागवत भूसे, संजय नागने, लाला आसबे, दत्ता आसबे आदी मान्यवर उपस्थित होते. 

भालके पुढे बोलताना म्हणाले की, माझ्या मतदार संघातिल गावाने सत्यमेव जयते वॉटर कफ स्पर्धेत मिळवलेले यश कौतुकास्पद असून यानंतर पुढील स्पर्धेच्या वेळी या गावाला लागेल ती मदत करून राज्यात पहिल्या क्रमांकाचे पाणीदार गाव बनवन्यास लागेल ती मदत करणार असल्याचे भालके म्हणाले. यावेळी सकाळचे सहयोगी संपादक अभय दिवानजी, अतिरिक्त जिल्हाधीकारी रामचंद्र शिंदे, युवा नेते प्रणव परिचारक, अर्बन बेंकेचे अध्यक्ष राहुल शहा यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत आसबे सर यांनी तर सूत्र संचालन हणमंत आसब गुरुजीं यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com