नामव्दारे राज्यात 3 हजार किलोमीटर जलसंधारणाचे काम

हेमंत पवार 
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

कऱ्हाड - नाम फाऊंडेशनचे काम तीन वर्षे अविरत सुरु आहे. अलिकडे स्वार्थाशिवाय माणुस कोणतेही काम करत नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात आमच्या कामापाठीमागे काहीतरी स्वार्थ असेल असे वाटत असेल. मात्र आम्हाला कोणताही पक्ष काढायचा नाही, निवडणुकही लढवायची नाही मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या सन्मानाची जागा पुन्हा मिळाळी या हेतुने आम्ही नाम आणि शिवमच्या माध्यमातुन निस्वार्थीपणे काम करत आहोत. त्याव्दारे राज्यात तीन हजार किलोमीटर जलसंधारणाचे काम झाले असुन अनेक शेतकरी स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत असे प्रतिपादन नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी केले.  

नाम फाऊंडेशन आणि शिवम प्रतिष्ठानच्यावतीने घारेवाडी (जि.सातारा) येथे शेतकरी स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यशाळा झाली. त्यावेळी ते बोलत होते. शिवमंचे प्रमुख मार्गदर्शक इंद्रजीत देशमुख, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शंतुन कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉ. अशोक सावंत, अरविंद कलबुर्गी, महेश मोहिते, दत्तात्रय पवार, गणेश थोरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

इंद्रजीत देशमुख म्हणाले, भविष्यातील पिढीसाठी चांगला काळ असावा यासाठी नाम आणि शिवमच्या माध्यमातुन प्रयत्न सुरु आहेत. त्याला सुजाण शेतकऱ्यांच्या माध्यमातुन चांगले रुप येईल. त्यासाठी शेतकऱ्यांनीही सहकार्य करावे.

Web Title: The work of conserving water for 3 thousand kilometers