समर्पित भावनेतूनच काम करावे लागेल - जिल्हाधिकारी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नगर : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील नागरिक हाच सेवेचा मुख्य केंद्रबिंदू असतो. त्यातही नगर जिल्ह्यात चांगले काम करणारे अधिकारी, कर्मचारी आहेत. पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचा उचित गौरव होत आहे. समन्वय व सुसंवाद ठेऊन आरोग्यसेवकांनी समर्पित भावनेतून काम केल्यास शासकीय रुग्णालयांचा कायाकल्प होऊन लौकिक निश्‍चित वाढेल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी व्यक्त केला. 

घटलेल्या कन्या जन्मदराच्या बाबतीत समुपदेशनाच्या माध्यमातून आरोग्यसेवक महत्वाची भूमिका बजावू शकतात. त्यांनी त्यात जाणीवपूर्वक प्रयत्न वाढवावेत, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यायातील नियोजन भवनात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत "कायाकल्प' पुरस्काराचे वितरण करताना ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, जिल्हा शल्यचिकित्सक बापूसाहेब गाडे, महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांच्यासह जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, परिचारिका यावेळी उपस्थित होते. 

Web Title: work with dedicated feeling said by collector