रमाई आवास घरकुल योजनेचे काम लवकरच मार्गी

bavikar.
bavikar.

मोहोळ (सोलापूर) -  मोहोळ शहरासाठी रमाई आवास घरकुल योजनेतर्गत कागदोपत्री  पुर्ण असलेल्या मंजुर घरकुलाची कामे एक महिन्याच्या आत सुरू होतील. असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिल्याची माहीती सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षका निर्मला बावीकर यांनी दिली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ शहरासाठी रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत २०१६ - १७ मध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक ५ कोटी रूपये निधी मंजुर आहे. पंरतु, काही तांत्रीक कारणामुळे व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व संबधित कर्मचारी  यांच्या निष्क्रीयतेमुळे घरकुलांची कामे रखडली आहेत असा आरोप घरकुलाचे लाभार्थी करीत आहेत. या संदर्भात या पूर्वी वेगवेगळ्या संघटनेच्या वतीने अनेक निवेदने देत  आंदोलनेही झाली आहेत. ता .४ जुन रोजी नगरपरिषदेसमोर मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा यशोदा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कल्यना खंदारे, नंदा बनसोडे, वर्षा दुपारगुडे, सिंधुताई वाघमारे, लता देवकुळे , हिराबाई गायकवाड, लोचना रणदिवे आदीनी धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनास सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीच्या निरीक्षका निर्मला बावीकर यांनी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी खासदार सुप्रीया ताई सुळे या लोकाभिमुख समाजकार्यामुळे मोहोळच्या या उपेक्षीत प्रश्नाकडे लक्ष देण्याची संधी मिळाली असे सांगत राष्ट्रवादी पक्ष अशा अन्यायग्रस्त घटकासाठी, उपेक्षितासाठी त्याला न्याय मिळेप्रर्यत रस्त्यावरची निकराची लढाई करायला सर्वात पुढे असतो हे सांगितले. त्या अनुषंगाने त्यांनी अध्यक्षा यशोदा कांबळे यांच्यासह  शहरातील अन्य  महिला आंदोलनकर्त्यासमवेत जिल्हाधिकारी राजेंद्र  भोसले यांची भेट घेतली होती. 

या भेटीमध्ये कागदोपत्री पुर्ण असलेल्या ५ घरकुल लाभार्थ्याचे चेक मुख्याधिकारी गावडे यांना तात्काळ देण्याच्या सुचना झाल्या. तर भुमी अभिलेख कार्यालयाच्या नोंदी असलेल्या ४o घरकुलांची कामे एक महिन्याच्या आत सुरू करावीत असे तोंडी आदेश संबधित नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आले. अनेक महिने प्रलंबित असलेल्या घरकुलाच्या प्रश्नाला यशोदा कांबळे यांच्या आंदोलनाने व जिल्हाधिकाऱ्यासमोर  जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निरीक्षकानिर्मला बावीकर यांच्या अभ्यासपूर्ण बाजू मांडण्याने लाभार्थ्याना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यातुन उमटत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com