इथे काम बोलते... जयंत पाटील यांनी कोरोना रुग्णालयाला भेट देऊन केलं कौतुक 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड गतीने वाढत असताना जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री म्हणून जयंत पाटील कमी पडत आहेत का, असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. अशावेळी जयंतरावांनी आज मिरज येथील कोविड रुग्णालयाला भेट दिली आणि तेथील कोरोना बाधितांशी संवाद साधला.

सांगली ः जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड गतीने वाढत असताना जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री म्हणून जयंत पाटील कमी पडत आहेत का, असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. अशावेळी जयंतरावांनी आज मिरज येथील कोविड रुग्णालयाला भेट दिली आणि तेथील कोरोना बाधितांशी संवाद साधला. पीपीई कीट, मास्क, फेस शिल्ड अशी संपूर्ण सुरक्षा बाळगून जयंतरावांनी या सेंटरमध्ये बारकाईने पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सोशल मिडियावर त्याची माहिती देताना "इथे काम बोलते', अशा शब्दांत डॉक्‍टरांचे कौतुक केले. 

सांगली जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 22 हजारावर पोहचली आहे. सध्या दहा हजाराहून अधिक लोक उपचाराखाली आहेत. बेडची संख्या 22 हून अधिक आहे. म्हणजेच, केवळ 25 टक्के लोकांना बेड उपलब्ध आहेत आणि 75 टक्के रुग्णांना आता घरी थांबूनच उपचार घ्यावे लागणार आहेत.

हे धोरण आता निश्‍चित झाले आहे. अशावेळी जयंतरावांनी सांगलीत तळ ठोकावा, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे. या स्थितीत त्यांनी मिरजेतील कोविड रुग्णालयात जावून तेथील व्यवस्थेची पाहणी केली. रुग्णांशी संवाद साधला. एका नव्वद वर्षे वयाच्या आजीबाईकडे आपुलकीने विचारपूस केली. डॉक्‍टरांनी काही सूचना दिल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work speaks for itself here ... Jayant Patil visited Corona Hospital and appreciated it