कटर मांडीला लागून कारागिराचा मृत्यू

 Worker Dies After Cutter Cut The Body Incidence In Kolhapur
Worker Dies After Cutter Cut The Body Incidence In Kolhapur

कोल्हापूर - लोणार वसाहत येथे ट्रकच्या बॉडी बांधण्याचे काम करीत असताना कारागिराला मांडीला कटर लागले. त्यात ते गंभीर जखमी झाले. सहकाऱ्यांसह मित्रांनी त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले; मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 

श्रीकांत विश्‍वनाथ लोहार (वय ५२, रा. सुतारवाडा, दसरा चौक) असे त्यांचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळतात त्यांच्या मित्रपरिवार व नातेवाइकांनी सीपीआर शवविच्छेदनाजवळ मोठी गर्दी केली होती. याबाबतची नोंद शाहपुरी पोलिस ठाण्यात झाली. 

याबाबत पोलिस व नातेवाइकांनी दिलेली माहिती अशी - श्रीकांत लोहार हे सुतारवाडा येथे राहत होते. एकत्र कुटुंबातील ते सर्वात ज्येष्ठ होत. ते लोहार व सुतार कारागीर होते. ते सकाळी दहाच्या सुमारास घरातून कामासाठी बाहेर पडले. ते मित्र प्रकाश वडणकर यांच्या ट्रकच्या बॉडी बांधण्याचे काम करत होते. त्यांच्या मदतीला वडणकर यांचा मुलगाही होता. सव्वाअकराच्या सुमारास काम करत असताना अचानक कटर श्रीकांत लोहार यांच्या मांडीला लागले. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. हा प्रकार पाहून त्यांचे सहकारी व रोहित घाबरून गेले. त्यांनी तातडीने त्यांना खासगी वाहनातून तावडे हॉटेल येथील दोन रुग्णालयात नेले. त्यांची प्रकृती गंभीर होत होती. ते पाहून या दोन्ही दवाखान्यांत त्यांना दुसऱ्या दवाखान्यात नेण्याचा सल्ला देण्यात आला.

या दरम्यान, रस्त्यावरील वाहतूक कोंडीत वाढ झाली होती. त्यावेळी त्यांच्या मदतीला वाहतूक पोलिस धावून आले. त्यांनी केलेल्या सहकार्यातून लोहार यांना सीपीआरमध्ये दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. ही घटना समजल्यानंतर मित्रपरिवार व नातेवाइक मोठ्या संख्येने सीपीआरमध्ये जमा झाले. नेमके काय घडला घडले हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आक्रोश केला. लोहार यांचा मोठा जनसंपर्क होता. ते येथील भगवा मित्र ग्रुपचे अध्यक्ष होते. दोनच महिन्यांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यापाठोपाठ घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

वाहतूक पोलिसांची मदत...
जखमी लोहार यांना तावडे हॉटेल परिसरातील रुग्णालयातून सीपीआरमध्ये आणण्यासाठी या परिसरात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांनी मोठे सहकार्य केले. त्यांनी खासगी वाहन उपलब्ध करून दिलेच, शिवाय वाहतुकीची कोंडी दूर तातडीने रुग्णालयाकडे जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com