ग्रीन माणदेश अंतर्गत उद्या दहिवडी येथे कार्यशाळा

रुपेश कदम
बुधवार, 27 जून 2018

मलवडी : माण-खटाव तालुके हरित बनवून दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी 'ग्रीन माणदेश' ह्या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण व संवर्धन कार्यशाळा उद्या गुरुवार 28 जून रोजी दुपारी 12 वाजता दहिवडी येथील डी. एस. पाटील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपसचिव डॉ. प्रमोद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा होणार आहे. सदर कार्यशाळेस रोहयोचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील, जिल्हा वन अधिकारी ए. एम. अंजनकर, माणचे सभापती रमेश पाटोळे, खटावचे सभापती संदीप मांडवे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार दशरथ काळे, गटविकास अधिकारी गोरख शेलार, माणचे उपसभापती नितीन राजगे, खटावचे उपसभापती कैलास घाडगे, पर्यावरण तज्ञ महेश गायकवाड उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास माण-खटावमधील ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन माणदेश फाऊंडेशन पुणेचे अध्यक्ष अशोक माने, ड्रिम सोशल फाऊंडेशनच्या हर्षदा जाधव-देशमुख, माणदेशी फाऊंडेशन म्हसवडचे प्रभात सिन्हा यांनी केले आहे.
 
Web Title: Workshop at Dahivadi under Green mandesh tomorrow