खळखळून हसा, तंदुरुस्त राहा!

संदीप खांडेकर
रविवार, 7 मे 2017

कोल्हापूर - तुम्हाला झोप आणि भूक लागत नाही ? वजनही कमी होत नाही? दमा, मधुमेह व रक्तदाबही आहे? मग विचार कसला करता, हसा ना खळखळून..! दिवसभरात केवळ दहा मिनिटे खळखळून हसला तर स्मरणशक्ती तर वाढतेच; शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. विशेष म्हणजे कोल्हापुरातील ३० हास्य क्‍लबमध्ये लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना हसण्याचे धडे दिले जातात आणि आरोग्य ठणठणीत राहण्यासाठी प्रयत्न केले जातात. 

कोल्हापूर - तुम्हाला झोप आणि भूक लागत नाही ? वजनही कमी होत नाही? दमा, मधुमेह व रक्तदाबही आहे? मग विचार कसला करता, हसा ना खळखळून..! दिवसभरात केवळ दहा मिनिटे खळखळून हसला तर स्मरणशक्ती तर वाढतेच; शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. विशेष म्हणजे कोल्हापुरातील ३० हास्य क्‍लबमध्ये लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना हसण्याचे धडे दिले जातात आणि आरोग्य ठणठणीत राहण्यासाठी प्रयत्न केले जातात. 

शहरात २० जानेवारी १९९८ ला पहिला हास्य क्‍लब सुरू झाला. डॉ. दिलीप शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हास्य चळवळ सुरू झाली. विनाशुल्क हास्याचे धडे देऊन अनेकांच्या आरोग्याच्या तक्रारींना त्यातून पूर्णविराम मिळाला. हळूहळू शहरात हास्य क्‍लबची संख्या वाढून ती आता ३०पर्यंत पोचली आहे. ज्यांच्या आरोग्याच्या तक्रारी आहेत, त्या केवळ हसल्याने दूर झाल्याचे डॉ. शहा सांगतात. मधुमेह, दमा, सर्दी, खोकला, रक्तदाब, अर्धशिशी यासाठी हसणे आवश्‍यक आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नयेत असे ज्यांना वाटते, त्यांनी तर हसलेच पाहिजे. 

मोठमोठ्याने हसल्याने आवाजाची गुणवत्ता सुधारते. त्याचबरोबर दिवसभरात आळसही येत नाही. जांभई, उलटी व ढेकर देण्याच्या प्रकारालाही पूर्णविराम मिळतो. पांढऱ्या पेशींच्या संख्येसह रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सकारात्मक विचारांनी दिवस आनंदात व्यतित होतो. ७० टक्के मानसिक तणावातून मुक्त होता येते. मानसिकदृष्ट्या स्थिर होतो येते आणि स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते. काम करण्याच्या क्षमतेत वाढ होते. ज्यांना संधिवाताचा त्रास होतो, त्यांनी दररोज हास्य क्‍लबमध्ये जाऊन खळखळून हसल्यास आजारच निघून जातो. याबाबत प्रफुल्ल महाजन सांगतात, की ‘‘निराशावादी प्रवृत्तीचा बीमोड करण्यासाठी हास्याचे ‘टॉनिक’ प्रत्येकाने घ्यायला हवे. प्रत्येक दिवस सुंदर आहे, तो आनंदाने जगला पाहिजे.’’ 

हास्याचे प्रकार
हास्याचे एकूण ७० प्रकार असल्याचे डॉ. शहा सांगतात. त्यातील काही प्रकारांची नावे अशी -
- भांगडा, पक्षी, नरसिंह, मोबाइल, वेलकम, मर्द मराठा, कोल्हापुरी पैलवान, लवंगी मिरची, कौतुक, टेन्शन फ्री, वन मीटर, लेझीम, मंत्री, विनाकारण, तू तू मै मै, कभी खुशी कभी गम.

हास्य क्‍लब म्हणजे केवळ एकत्र जमून हसणे, अशी गैरसमजूत लोकांमध्ये आहे. ५० मिनिटे योगा, प्राणायाम व त्यानंतर दहा मिनिटांत दहा ते पंधरा प्रकारांत हसणे, असा रोजचा क्‍लबमधील कार्यक्रम असतो. विशेष म्हणजे हसण्याचे धडे विनाशुल्क दिले जातात.  
 - डॉ. दिलीप शहा

Web Title: world laughing day