साईमंदिराचा जागतिक विक्रम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

शिर्डी  : ""साईबाबा समाधी मंदिराने जागतिक विक्रम केला आहे. सर्वाधिक लोकांनी भेटी दिलेले मंदिर म्हणून "सन्माननीय' अशा वर्गवारीत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये (लंडन) नोंद झाली आहे. तसे पत्र साईबाबा संस्थानाला प्राप्त झाले आहे,'' अशी माहिती संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. 

हेच वाचा  भाऊसाहेब कर्तव्यावर आहेत

सर्वाधिक लोकांनी भेट दिलेल्या मंदिरांच्या यादीत

शिर्डी  : ""साईबाबा समाधी मंदिराने जागतिक विक्रम केला आहे. सर्वाधिक लोकांनी भेटी दिलेले मंदिर म्हणून "सन्माननीय' अशा वर्गवारीत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये (लंडन) नोंद झाली आहे. तसे पत्र साईबाबा संस्थानाला प्राप्त झाले आहे,'' अशी माहिती संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. 

हेच वाचा  भाऊसाहेब कर्तव्यावर आहेत

सर्वाधिक लोकांनी भेट दिलेल्या मंदिरांच्या यादीत

मुगळीकर म्हणाले, ""श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरिता देश-विदेशांच्या कानाकोपऱ्यांतून सर्वाधिक भाविक येथे येतात. रोज 50 ते 60 हजार भाविक येथे भेटी देत असतात. संस्थानाचा उत्सव, तसेच सुटीच्या दिवशी तर ही संख्या एक लाखावर जात असते. त्याची दखल घेत "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस' समितीने श्री साईबाबा समाधी मंदिराची नोंद, सर्वाधिक लोकांनी भेट दिलेल्या मंदिरांच्या यादीत केली आहे. तसे पत्र प्राप्त झाले आहे.'' 

"श्रद्धा' आणि "सबुरी'वर सर्वाधिक विश्वास

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसच्या समितीने श्री साईबाबा समाधी मंदिरास भारतातील सर्वाधिक भेट दिल्या गेलेल्या मंदिरांपैकी एक, अशी नोंद केली आहे. ही एक धर्मनिरपेक्ष जागा असून, येथे सर्वधर्मसमभाव आहे. "श्रद्धा' आणि "सबुरी'वर सर्वाधिक विश्वास ठेवला जातो. एक अशी जागा, जेथे सर्व जण प्रार्थनेत नतमस्तक होतात. जेथे श्रद्धेचे महत्त्व आहे आणि जेथे आशा बांधल्या जातात, सबुरीची फळे मिळतात आणि जेथे सर्वदूर एका कायम समाधानाचे आणि अतीव आनंदाचे राज्य असते. 

हेच वाचा ग्रामसेवकाविरोधात 94 लाखांच्या अपहाराचा गुन्हा 

नोंदणीपत्र संस्थानाला देणार

शुद्ध समताभावातून मानवतेचा आणि शांततेचा, असा "सबका मालिक एक' हा मंत्र दिला, त्या सामंजस्याचा खराखुरा खजिना असलेल्या दिव्य संताचे हे स्थान आहे. श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने ही भूमी एक पवित्र स्थान झाली आहे, असे पत्रात कळविले आहे. लवकरच "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस'चे अधिकारी येथे येऊन हे नोंदणीपत्र संस्थानाला देणार असल्याचे मुगळीकर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Record of Sai mandir