'शड्डू'चा आवाज घुमेना! 300 रुपयांच्या रोजंदारीवर मल्ल शेतकऱ्यांच्या बांधाला

दोन वर्षे कुस्ती मैदान नाही; खुराकाला पैसा आणायचा कोठून?
'शड्डू'चा आवाज घुमेना! 300 रुपयांच्या रोजंदारीवर मल्ल शेतकऱ्यांच्या बांधाला

तुंग : कोरोना संसर्गाने (covid -19) जगभर हाहाकार माजला आहे. लॉकडाऊन, (lockdown and curfew) संचारबंदीची अनेकांना झळ बसत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून त्यांनी गावाकडे धाव घेतली आहे. अनेकांना कोरोनाचा फटका बसला आहे. मल्लांनाही (wrestler) तालिम सोडून द्यावी लागल्याने त्या ओस पडल्या आहेत. दोन वर्षे कुस्ती मैदान नाही की यात्रा नाहीत, त्यामुळे खुराकाला पैसा आणायचा कोठून? असा प्रश्‍न पडला आहे. सांगलीतील तुंग येथील (sangli, tung) अनेक पदकांसह राष्ट्रीय खेलो इंडिया (khelo India) पदक विजेती संजना बागडी (sanjana bagadi) यांनही याची झळ बसत आहे. ३०० रूपयाच्या रोजंदारीवर कामासाठी इतरांच्या बांधावर जावे लागत आहे.

लॉकडाऊनमुळे अनेकांसमोर आर्थिक (economic problem) संकट उभे आहे. लाल मातीतील हे मल्लही याला अपवाद राहिले नाहीत. कुस्तीत नाव कमावण्यासाठी गाव सोडून दूर तालमीत आलेले सर्वजण गावाकडे परतले आहेत. शालेय कुस्तीसह महाराष्ट्र केसरी (maharashtra kesari) व इतर कुस्ती स्पर्धा झाल्या नाहीत. कुस्ती मैदानेच भरत नसल्यामुळे मल्लांसमोर खुराकाचा प्रश्‍न आहे. केवळ सराव करून स्पर्धा होणार नसतील तर काय उपयोग? असा विचार अनेकजण करत आहेत. तालमी ओस पडल्या असून गेल्या दीड वर्षापासून शड्डूचा आवाज घुमलेला नाही.

'शड्डू'चा आवाज घुमेना! 300 रुपयांच्या रोजंदारीवर मल्ल शेतकऱ्यांच्या बांधाला
सदावर्ते वक्तव्य थांबवा नाहीतर कोल्हापूर पैलवानी हिसका दाखवू ; संघटनांचा इशारा

दानशूर मंडळीकडून मल्लांना मदत मिळणेही कठीण झाले आहे. या परिसस्थितीत मल्लांना सध्या मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करावा लागतोय. अनेक मल्लांप्रमाणे तुंग (ता. मिरज) येथील संजना खंडू बागडी यांचा परिस्थिती तीच आहे. घरातील सदस्य मच्छीमारीचा व्यवसाय करतात. व्यवसाय करून मुलीला नामांकित मल्ल बनवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेच. संजना सध्या बारावीत शिकत आहे. तसेच कवलापूर येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील यांच्या कुस्ती केंद्रात दीपक पाटील, सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. तुंग ते कवलापूर असा दररोज २५ किलोमीटर प्रवास करून ती उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्यात सरावाला करते.

संजना हीने राज्यस्तरीय संघटनेच्या, शासकीय, शालेय स्पर्धामधून अनेक सुवर्ण पदके तसेच भारतीय कुस्ती महासंघ, खेलो इंडिया स्पर्धेत कास्य पदके घेतली आहेत. परंतू सध्या ती अडचणीत आहे. मच्छीमारीचा व्यवसाय करून चार पैसे मिळत होते. परंतू लॉकडाउनमुळे तेही बंद झाले. घरात खर्चाला मिळणारे पैसेही बंद झाले. त्यामुळे तिने लोकांच्या बांधावर रोजंदारीवर जाण्याची निर्णय घेतला.

'शड्डू'चा आवाज घुमेना! 300 रुपयांच्या रोजंदारीवर मल्ल शेतकऱ्यांच्या बांधाला
वामिकाचा फोटो काढला, अनुष्का भडकली

‘‘ही व्यथा एकट्या संजनाची नाही अशा कितीतरी मल्लांपुढे हा प्रश्‍न आवासून उभा आहे. सरकारने याकडे लक्ष देऊन मदत करण्याची गरज आहे. एक पैलवान तयार होत असताना किती तरी वर्ष तपश्चर्या करावी लागते. सध्या संकट राष्ट्रीय असले तरी नियम पाळून कोरोनाला हद्दपार करायची ताकद पैलवानामध्ये आहे. लॉकडाऊन शिथिल केले असून मल्लांना व्यायाम व सराव करायला तालमी, कुस्ती केंद्र सुरू करावीत.’’

- उत्तमराव पाटील (आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com