यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

karhad
karhad

कऱ्हाड : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त देश, राज्य पातळीवरील नेत्यांनी त्यांच्या समाधीस्थळी जावून अभिवादन केले. त्यानिमित्त येथे सुरू असलेल्या भजी मंडळाच्या कार्यक्रमालाही त्यांनी उपस्थिती लावली. अभिवादन करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विद्यामान मंत्री, विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. 
 
राज्याचे पहिले मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमीत्त विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहुन त्यांच्या येथील प्रीतिसंगावरील समाधीस्थळी अभिवादन केले. मुख्यमंत्री फडणवीस, माजी केंद्रीय कृषीमंत्री जेष्ठ नेते पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, सकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमादर बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई, विश्वजीत कदम, आनंदराव पाटील, नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, सर्व नगरसेवक, ज्येष्ठ नेते कल्लाप्पा अण्णा आवाडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल रुक्मीणी मंदिरे समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, विशेष पोलिस महानिरक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी कैदास शिंदे, पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे, मुख्याधिकारी यशवंत डांगे, अशोकराव चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, कृषी सभापती मनोज पवार, देवराज पाटील, समाज कल्याण सभापती शिवाजीराव सर्वगौड, मानसिंगराव जगदाळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, राष्ट्रवादीचे युवा नेते सारंग पाटील, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, जिल्हा परिषदेचा सदस्य सागर शिवदास, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एखनाथ बागडी, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, बाळासाहेब सोळस्कर, मलकापूरचे माजी उपाध्यक्ष कॉग्रसेचे दक्षिण तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, कॉग्रेसचे शहराध्यक्ष आप्पा माने, काँग्रेसचे उत्तर तालुकाध्यक्ष अविनाश नलवडे, इंद्रजित चव्हाण, वैभव थोरात, नगरसेवक विजय वाटेगावकर, ज्येष्ठ नगरेसवक विनायक पावसकर, विद्या पावसकर, मुख्याधिकारी यशवंत डांगे, सुधीर धुमाळ, संजय जगदाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष पाटील, भाजपाचे सुदर्शन पाटसकर, श्री पेंढारकर, पंचायत समितीचे सदस्य रमेश चव्हाण यांच्यासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी समाधीस पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांची समाधी आकर्षक, सगंधी फुलांनी सुशोभित करण्यात आली होती. शैक्षणिक सहलीही येथे येत होत्या. मुबंईहून आलेल्या यशवंत समता ज्योतीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.  

समाधीस्थळी गणेश पारगावकर व त्यांच्या सहकार्‍यांनी सुरेल भजन म्हटले. मान्यवरांनी तेथे विश्रांती घेवून भजनाचा आनंद लुटला. दिवसभर नागरिकांची मांदियाळी समाधीस्थळी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com