युटोपियन शुगर्सचे यंदा विक्रमी गाळप

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा - तालुक्यातील कचरेवाडी येथील युटोपियन शुगर्सने मागील सर्व गळीत हंगामातील ऊस गाळपाचे विक्रम यंदाच्या दुष्काळात मोडीत काढीत चालू गळीत हंगामात उच्चांकी  गाळप केले.

युटोपियन शुगर्सचा हा पाचवा गळीत हंगाम आहे. गळीत हंगाम 2017-2018 मध्ये कारखान्याने 157 दिवसामध्ये  616025 मे.टन ऊसाचे गाळप करीत 10.76 रिकव्हरी सह 662845 किवन्ट्ल साखरेचे उत्पादन केले होते. सुरु वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक व कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांच्या योग्य नियोजनामुळे कारखान्याने विक्रमी कामगिरी केली आहे. दैनंदिन 3500 मे.टन. गाळप क्षमता असणार्‍या कारखान्याने चालू गळीत हंगामात 632311.310 मे.टन गाळप करीत 641600 साखर पोती उत्पादीत केली. साखर उतारा 10.15 राहिला असून को -जन मधून 4.92 कोटी वीज निर्मिती करून 3.24 कोटी वीज निर्यात केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संवर्धित ऊस खोडवा व्यवस्थापन तंत्रज्ञान, शून्य मशागत, जैविक व सेंद्रिय पूर्व व्यवस्थापन, रासायनिक खतांचा प्रभावीपणे वापर अशा नवनवीन योजना राबवण्यास सुरुवात केल्याचा लाभ होत आहे. या कामगिरीमध्ये शेती विभाग, इंजींनीयरिंग व उत्पादन विभाग यांनी आधिकचे परिश्रम घेतले..

कारखान्याची निर्मिती ही मुळातच ऊस उत्पादकांचे हीत डोळ्यासमोर ठेऊन केली. त्यामुळे कारखान्याने मागील चार ही वर्षी एफ.आर.पी.पेक्षा जास्तीचा दर दिलेला आहे. कारखान्याच्या गळीत हंगामची सांगता झाली आहे. ऊस उत्पादकांना चांगला दर देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. मात्र, साखरेचे बाजार भाव प्रचंड प्रमाणात घसरल्यामुळे कारखानदारी अडचणीत आलेली होती. सदर अडचणीत मार्ग काढण्यासाठी केंद्र शासनाने दोन वेळा साखर विक्रीच दर MSP (Minimum Selling Price)॰ भाव निश्चित करण्यात आला होता. सुरूवातीस 2900 रुपये प्रती क्विंटल या प्रमाणे MSP भाव निश्चित केल्यानंतर ही साखर उत्पादन करण्यासाठी येत असणारा प्रत्यक्ष खर्च याचा विचार करता साखर उद्योगास मदत व्हावी या उद्देशाने 3100 रु. MSP केली आहे. मात्र सुरु वर्षी हंगामाच्या सुरूवातीस असणारे साखरेचे दर व सध्याचे साखरेचे दर यामध्ये ४०० ते ५०० रु.चा फरक पडलेला आहे. साखरेचे दर वाढलेले आहेत मात्र उत्पादन जास्त झाल्यामुळे बाजारपेठेत साखरेस सध्या मागणी नाही. तरीही ऊस उत्पादक यांना योग्य तो दर देण्यास कट्टीबद्ध राहणार आहोत. उमेश परिचारक (चेअरमन – युटोपीयन शुगर्स लि.). 

कारखान्याचा यांत्रिक विभाग हा अत्याधुनिक असल्यामुळे या वर्षी कारखाना गाळपाचा नवा उच्चांक केला कारखान्याने को. जन प्रकल्पातून आतापर्यंत 4.72 कोटी युनिट वीज निर्मिती व 3.08 कोटी वीज निर्यात केली. त्यामुळे त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून ऊस उत्पादकांना जास्तीचा दर देणे शक्य होणार आहे.
 उत्तमराव पाटील (कार्यकारी संचालक – युटोपीयन शुगर्स लि.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com