यंदा 92 लाख वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन 

2traffic_0.jpg
2traffic_0.jpg

सोलापूर : वाहतूक नियम मोडणाऱ्यांत महाराष्ट्र अव्वल असून यावर्षी राज्यातील तब्बल 91 लाख 74 हजार जणांनी नियमांचे उल्लंघन केले. त्यांच्याकडून 163 कोटी 83 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून देण्यात आली. यावर्षी जानेवारी ते 19 डिसेंबरपर्यंत 32 हजार 868 अपघात झाले असून त्यामध्ये 11 हजार 494 जणांचा मृत्यू झाला असून 29 हजार जण जखमी झाल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. 

लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दुसरीकडे सर्वाधिक रस्ते अपघातही मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. राज्यात दरवर्षी होणाऱ्या रस्ते अपघातात सरासरी साडेबारा हजार जणांचा मृत्यू होतो. तसेच दरवर्षी राज्यातील 90 लाख वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. दुसरीकडे अपघातांची संख्यादेखील दरवर्षी सरासरी 35 हजारांहून अधिक असल्याचे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले. राज्यात एक हजार 324 अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) असून मागच्या वर्षीच्या तुलनेत त्यामध्ये 1275 ब्लॅक स्पॉट होते. त्या पार्श्‍वभूमीवर संबंधित यंत्रणेच्या उपाययोजनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला धारेवर धरले. त्यानंतर पुणे, सोलापूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये हेल्मेटसह वाहतूक नियम उल्लंघनप्रकरणी कारवाया करण्यात येत आहेत. 

राज्यातील वाढते अपघात आणि त्यातील मृत्यू व जखमींची वाढती संख्या चितांजनक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित यंत्रणेने अपघात कमी होण्याच्यादृष्टीने काय उपाययोजना केल्या, याबाबत 25 डिसेंबरपर्यंत अहवाल मागितला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक नियमांचे पालन होऊन अपघात कमी व्हावेत व स्वयंशिस्त लागावी या उद्देशाने कारवाई केली जात आहे. 
- अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर 

तीन वर्षांतील तुलनात्मक स्थिती  
2016

नियम मोडणारे  83,90,725 
अपघात  39,878 
मृत्यू 12,935 
जखमी 35,884 
दंड वसूल 123.21 कोटी 

2017 
नियम मोडणारे 1,02,43,995 
अपघात 35,853 
मृत्यू 12,164 
जखमी 32,128 
दंड वसूल 201.77 कोटी 

2018
नियम मोडणारे 91,74,602 
अपघात 32,869 
मृत्यू 11,809 
जखमी 29,074 
दंड वसूल 163.83 कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com