'प्रिसिजन'चे 'यांना' मिळणार यंदाचे पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

- शुक्रवारपासून सोलापूरमध्ये विविध कार्यक्रम
- तीन लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह असे प्रथम पुरस्काराचे स्वरूप
- डॉ. सुहासिनी शहा यांची पत्रकार परिषदेत माहिती

सोलापूर : सोलापूरच्या सांस्कृतिक पटलावरील एक आगळा वेगळा प्रयोग म्हणून 10 वर्षांपासून प्रिसिजन गप्पा सुरू आहेत. दिवाळीनंतर सोलापूरकरांसाठी दर्जेदार मेजवानी प्रिसिजन गप्पाच्या माध्यमातून मिळत असून यंदाच्या गप्पांचे पर्व शुक्रवारपासून (ता. 15) सुरू होणार असल्याची माहिती प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

असं करतात पोस्टमार्टेम 

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सौंदर्याची ओळख असलेल्या लावणीच्या ढोलकीने गप्पांना शिवछत्रपती रंगभवन सभागृहात सायंकाळी 6.25 वाजता सुरवात होणार आहे. रविवारी (ता. 17) प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कारही दिला जाणार आहे. यंदाचा प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप येथील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व स्व. सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार सांगोला तालुक्‍यातील महूद बुद्रूक येथील कासाळगंगा फाउंडेशनला दिला जाणार

आहे. कृतज्ञता पुरस्काराचे स्वरूप तीन लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह असे आहे. तर शहा स्मृती पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रुपये रोख अन्‌ सन्मानचिन्ह असे आहे, अशी माहिती सौ. शहा यांनी या वेळी दिली. दरम्यान, भगीरथ प्रतिष्ठानने ग्रामविकासातून गावाला स्वयंपूर्ण करण्याचा दर्जेदार प्रयत्न केला आहे तर पाण्याचे महत्त्व पटवून देऊन लोकसहभागातून पाणी अडविण्याचे उत्तम काम कासाळगंगा फाउंडेशनने केल्याची माहिती प्रिसिजन उद्योग समूहाचे अध्यक्ष यतीन शहा यांनी दिली. या पत्रकार परिषदेला माधव देशपांडे, आदित्य गाडगीळ उपस्थित होते.

आठ दिवसानंतर 'या' प्रेमवीराला बेड्या

अशा रंगणार प्रिसिजन गप्पा...
- शुक्रवारी : (रंग ढोलकीचे : सादरकर्ते- नीलेश परब, कृष्णा मुसळे, सत्यजित प्रभू, कमलेश भडकमकर व सहकारी)
- शनिवारी : (आनंदयात्री : अतुल परचुरे यांची प्रकट मुलाखत होणार असून पुष्कर श्रोत्री मुलाखत घेतील)
- रविवारी : (कथा भगीरथ प्रयत्नांची : डॉ. प्रसाद देवधर व प्रमोद कुलकर्णी यांचा सहभाग)
- सोमवारी : (जल व्यवस्थापन आणि ग्रामविकास : आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांची प्रकट मुलाखत सिनेअभिनेते गिरीश कुलकर्णी घेतील)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year's award for Precision