हो इथे, साऱ्यांना वाहन उचलावंच लागतंय 

Yes, here we have Lift the vehicle
Yes, here we have Lift the vehicle

मरवडे (सोलापूर) : पंढरपूर-विजयपूर महामार्गाचे काम मरवडे (ता. मंगळवेढा) येथे रखडल्यामुळे ग्रामस्थ व वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे. कसरत करीत प्रवास करावा लागत असताना वाहनधारक एकमेकांना तुमचे वाहन उचलून बाजूला ठेवू का? असे सुनावतात. रस्त्याच्या खोदाईमुळे इथे तुम्हा-आम्हा साऱ्यांनाच उचलावं लागतंय असे बोल सुनावीत जरा सबुरीने घ्या, असा सल्ला ग्रामस्थ देतात. रस्त्याच्या अर्धवट कामामुळेच एकमेकांना वाहन उचलण्याची वेळ आली असल्याने वाहनधारक व ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. 

पंढरपूर-विजयपूर महामार्गाची किरकोळ कामे वगळता या संपूर्ण महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मरवडे येथे मात्र गावातील घरापेक्षा रस्त्याची उंची जास्त असल्यामुळे पावसाळ्यात घरे पाण्याखाली जाऊ शकतात व उंचावरील रस्त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळू शकते, असे सांगत मरवडे गावातील पंढरपूर-विजयपूर महामार्गाचे काम ग्रामस्थांकडून बंद पाडण्यात आले. शासन दरबारी याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली. मरवडे गावातील रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून झालेला अर्धवट रस्ता निकामी करून पुन्हा नव्याने रस्ता उभारणे शक्‍य नाही, असे कारण सांगत मरवडेतील अर्धवट रस्त्याच्या कामास पुन्हा सुरवात करण्यात आली. 

मरवडे गावातील अर्धा किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारीसाठी खोदकाम करीत कामास गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून वेगवेगळी कारणे देत काम थांबविण्यात आले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारी व मधून अरुंद रस्ता अशा वाटेतून कसरत करीत वाहनधारकांना व वाटसरूंना प्रवास करावा लागत आहे. आता कोणतीही कारणे न सांगता शासकीय नियमाप्रमाणे मरवडेतील अर्धवट कामे पूर्ण करत ग्रामस्थ व वाहनधारकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. 

लवकरच कामास सुरवात 
रस्त्यांची कामे करीत असताना वेळोवेळी येथील रस्त्याजवळील ग्रामस्थाकडून हद्द निश्‍चित करण्याबाबत तक्रारी केल्या जात आहेत. आता तालुका भूमिलेख कार्यालयाकडे मोजणीसाठी अर्ज करीत रस्त्यांची हद्द निश्‍चित करून लवकरच कामास सुरवात करण्यात येईल. 
-विजयकुमार स्वामी, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, सोलापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com