‘यिन’चा हॅप्पीवाला बड्डे...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

सांगली - यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) ही कॉलेज गोईंग युथच्या गळ्यातील ताईद बनली आहे. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील विविध कॉलेजमध्ये जाळ पसरवत तरूणाईला एका व्यासपीठावर आणण्याचे काम केले आहे. आजही ही तरूणाई एकत्र जमले होते. मस्त एन्जॉय मुडमध्ये पुन्हा समाजसेवाचा निर्धार या विद्यार्थ्यांनी केला. निमित्त होते तिसऱ्या वर्धापनदिनाचे. यावेळी सहयोगी संपादक शेखर जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. 

सांगली - यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) ही कॉलेज गोईंग युथच्या गळ्यातील ताईद बनली आहे. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील विविध कॉलेजमध्ये जाळ पसरवत तरूणाईला एका व्यासपीठावर आणण्याचे काम केले आहे. आजही ही तरूणाई एकत्र जमले होते. मस्त एन्जॉय मुडमध्ये पुन्हा समाजसेवाचा निर्धार या विद्यार्थ्यांनी केला. निमित्त होते तिसऱ्या वर्धापनदिनाचे. यावेळी सहयोगी संपादक शेखर जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. 

विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने यिनची चळवळ सुरू केली आहे. राज्यभरातील महाविद्यालयात याचे जाळे विणण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून या उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला आहे. आज सकाळी पत्रकार संघाच्या सभागृहात सर्व सदस्यांची उपस्थितीती होती. उत्साहात अन्‌ जल्लोषी वातावरणात केक कापून वर्धापन दिन साजरा झाला. पुढील वर्षी सर्वच कॉलेजमध्ये ही चळवळ पोहचवून सदस्य नोंदणी करू. आणि समाजसेवाही करू, असा निर्धार विद्यार्थ्यांनी केली. 

सदस्य इंद्रजित मुळे याने यिनचा आढावा घेतला. सहयोगी संपादक शेखर जोशी म्हणाले, ‘‘यिन चळवळीत विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे. 

आपल्या नेतृत्वगुणाला वाव देण्यासाठी ही चळवळ आहे. त्याचा आजवर अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांची पर्वणीही विद्यार्थ्यांसाठी या माध्यमातून मिळते.’’

यिनचे अर्थमंत्री सत्यजित कदम, पालकमंत्री मृण्मयी माळी, चेअरमन राधिका घोरपडे, सदस्य प्रशांत जाधव, ओंकार पवार, पांडूरंग गयाळे, संदेश केस्ते, ओंकार पाटील, सुनील जावीर, केदार मगदूम, श्रीकांत माळगे, वरदराज जोतराव, प्रियांका गोडबोले, स्वप्नाली सूर्यवंशी, ऋषाली रजपूत, आरती कोरेगावे, श्रद्धा कोरेगावे, सुप्रभा केस्ते, रेखा पाटील, अनुश्री इंगळे, मधुरा कोळीगीरी, श्रद्धा सुतार,  भक्ती ढोले, राजश्री गडदे, अभया पवळ, शुभदा नलवडे, स्नेहल कुरणे, धनश्री बर्गे उपस्थित होते. जिल्हा समन्वयक विवेक पवार यांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले. निकीता शिंदे हिने सूत्रसंचालन केले. स्वप्निल सूर्यवंशी याने आभार मानले. कार्यक्रमासाठी 
राममंदिर चौकातील परिवार बेकरीचे सहकार्य लाभले. 

‘‘यिन व्यासपीठामुळे गेल्या वर्षभरात बरचकाही शिकण्यासारखे मिळाले. या व्यसपीठामुळे संभाष कौशल्य विकसीत झाले. त्याचा भविष्यात मला नक्कीच फयदा होणार आहे.’’ 
- माधुरी डोंगरे, हर्षली जाधव यिन सदस्य.

‘‘यिनच्या पहिल्यावर्षांपासून मी याचा सभासद आहे. व्यासपीठामुळे नेतृत्वगुण विकसीत होण्यास मदत मिळाली. इथुन पुढेही मी या व्यासपीठात सक्रीय राहणार आहे.’’
- संग्राम चव्हाण, यिन सदस्य.

सदस्य नोंदणीला प्रारंभ 
मित्रहो...यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) चळवळीत आपल्याला सहभागी व्हायचंय का? तर नावनोंदणीला प्रारंभ झालाय. येणाऱ्या वर्षांत तज्ज्ञांच मार्गदर्शन, समाजसेवा आणि बरच काही करण्याची संधी मिळणार आहे. तर ही संधी सोडू नका आजच आपलं नाव नोंद करा. अधिक माहितीसाठी राममंदिर चौकातील ‘सकाळ’च्या विभागीय कार्यालयात संपर्क साधावा.

Web Title: YIN Inspirators Network Birthday