आशा हे जीवन आहे तर निराशा ही मृत्यू आहे - योगगुरू बाबा रामदेव

राजशेखर चौधरी
सोमवार, 19 मार्च 2018

अक्कलकोटला सलग तीन दिवस योग, ध्यान आणि चिकीत्सा शिबीर घेण्यात आले. त्याला अक्कलकोट व परिसरातील जनतेने दररोज तीस हजारापेक्षा जास्त जण उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अक्कलकोट - आशा हे जीवन आहे तर निराशा ही मृत्यू आहे असे प्रतिपादन योगगुरू बाबा रामदेव यांनी केले. ते आज विवेकानंद प्रतिष्ठान अक्कलकोट आणि पतंजली महिला योग समिती आयोजित अंतिम दिवसाच्या शिबिरात बोलत होते. अक्कलकोटला सलग तीन दिवस योग, ध्यान आणि चिकीत्सा शिबीर घेण्यात आले. त्याला अक्कलकोट व परिसरातील जनतेने दररोज तीस हजारापेक्षा जास्त जण उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आजच्या प्रारंभास डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, चिकरेवणसिद्ध महास्वामी, अभिनव शिवलिंगेश्वर महास्वामी, अविनाश महागांवकर, 'सकाळ' चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, आयोजक सचिन कल्याणशेट्टी, श्रीराम लाखे, सुमनादीदी आदींसह पतंजली योग समिती व विवेकानंद प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

Baba Ramdev

अक्कलकोट सारख्या सीमावर्ती तालुक्यातील जनतेने दिलेल्या प्रचंड प्रतिसादाने गेले तीन दिवस अक्कलकोट शहर आणि फत्तेसिंह मैदान नागरिकांनी फुलून गेले होते. यावेळी संबोधताना बाबा रामदेव म्हणाले की 150 वर्षांपूर्वी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांनी अतर्क, अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करून समाज जागृतीचे कार्य सुरू केले होते. तेच कार्य मी योग आणि ध्यानधारणेतून पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करीत आहे.आपण शिकत असलेले प्राणायामाने हे रोगनियंत्रणच नव्हे तर रोगमुक्ती देखील होऊ शकते. प्रत्येकांनी आपल्या शरीराचे पिक्चर प्रथम नीट ठेवा आणि नंतर टीव्ही वरील पिक्चर बघत चला असे सांगून मी अक्कलकोटला सतत तीन दिवस दिलेले ज्ञान आपण मी गेल्यानंतरही कायम ठेवून आपले व समाजाचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करा. सम्यक मती, सम्यक भक्ती, सम्यक वृत्ती हे तिन्ही ठीक असेल तरच सारे जीवन ठीक असेल असे ते शेवटी म्हणाले. या शिबिरासाठी जिल्हा पतंजली योग समितीचे संतोष दुधाळ, नितीन मोरे, मोहन कुंभार, नवनाथ माने, सुजाता शास्त्री, रत्नप्रभा माळी, रघुनंदन भुतडा, चंद्रकांत दिवाकर, संगीता जाधव, अविनाश अळ्ळीमोरे तसेच
विवेकानंद प्रतिष्ठानचे अशोक येणगुरे, संतोष जिरोळे, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, सागर कल्याणशेट्टी, मनोज कल्याणशेट्टी, स्वामीनाथ पुकाळे,अतुल कोकाटे, मल्लिकार्जुन आळगी, गुरुपादप्पा आळगी,
अमित थोरात, बाळा शिंदे, मल्लिनाथ मसुती, शशिकांत लिंबितोटे, संतोष जिरगे, महेश कापसे, नितीन पाटील, राजकुमार झिंगाडे, चंद्रकांत दसले, विकास तळवार, शरणू मसूती, धनंजय गाढवे आदींसह प्रतिष्ठानचे सदस्य, कल्याणशेट्टी शिक्षण संकुल कर्मचारी वृंद, सोलापूर जिल्हा व तालुका पतंजली व महिला समिती, तालुक्यातील योग शिक्षक, स्वयंसेवक व कार्यकर्ते यांनी उत्कृष्ट संयोजन केले आणि या नेटक्या नियोजनाबद्दल रामदेवबाबा यांनी त्यांचे सन्मान केले.

Baba Ramdev

Web Title: Yog camp were conducted for three days in Akkalkot by baba ramdev