सांगली-मिरजेत "सकाळ"तर्फे योग शिबिरास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

सांगली - शालेय विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत योगशास्त्राचे प्राथमिक ज्ञान मिळावे, त्यांच्यात आवड निर्माण व्हावी, या हेतूने "सकाळ माध्यम समूहा'तर्फे योगशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात एकाचवेळी प्रारंभ झालेल्या योगयज्ञास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. 

रोटरी क्‍लब ऑफ सांगली, सूरज फाउंडेशन (कुपवाड), श्रीराम हॉल (मिरज), विजयसिंहराजे पटवर्धन दरबार हॉल योग केंद्र यांचे विशेष सहकार्याने शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तीन वर्षांपासून "सकाळ'ने योग शिबिर आयोजनात पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत सांगली शहरात शिबिर होत होते. मिरज आणि कुपवाडमध्येही शिबिर व्हावे, अशी मागणी होती. त्यानुसार यंदा तीन ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. शरीर व मनाच्या स्वास्थ्यासाठी निवडक आसने, प्राणायाम आदी योगाच्या विविध प्रकारांची माहिती शिबिरात देण्यात येत आहे. योगविशारद बाळकृष्ण चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली योगशिक्षक मार्गदर्शन करत आहे. प्राणायाम, क्रिया शिथिलीकरण, ध्यानधारणा, अध्यात्म साधना अनुभवण्यासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे अहावान संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 

* सांगली- रोटरी क्‍लब हॉल, गणेशनगर 
* कुपवाड- नव कृष्णा व्हॅली स्कूलचे क्रीडांगण. 
* मिरज- श्रीराम हॉल, ब्राह्मणपुरी. 
* तारीख- 18 ते 21 जून 
* वेळ- सकाळी 6.30 ते 7.30 
* काय आणावे - सतरंजी/चटई, रुमाल, पाणी. 
* महिलांनी ट्रॅकसूट किंवा पंजाबी ड्रेस परिधान करावा. 
* अधिक माहितीसाठी - रवींद्र डुबल (भ्रमणध्वनी - 9890828604), 
तानाजी जाधव (9881129290). 

Web Title: Yoga camp started by Sakal in Sangli-Mirajat