अक्कलकोट - योगगुरू रामदेवबाबा यांच्या योग शिबिरास भरघोस प्रतिसाद

राजशेखर चौधरी
शनिवार, 17 मार्च 2018

अक्कलकोट : विवेकानंद प्रतिष्ठान व सोलापूर जिल्हा योग समिती यांच्या वतीने घेण्यात आलेल्या योग गुरू रामदेवबाबा यांच्या योग शिबिरास आज पहाटे उत्साहात प्रारंभ झाला. एवन चौकातील राजे फत्तेसिंह मैदानावर दि. १७ ते १९ मार्च हे तीन दिवस दररोज पहाटे ५ ते साडेसात या वेळेत हे शिबित घेतले जात आहे. त्याला तालुक्यातील तमाम जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला.

अक्कलकोट : विवेकानंद प्रतिष्ठान व सोलापूर जिल्हा योग समिती यांच्या वतीने घेण्यात आलेल्या योग गुरू रामदेवबाबा यांच्या योग शिबिरास आज पहाटे उत्साहात प्रारंभ झाला. एवन चौकातील राजे फत्तेसिंह मैदानावर दि. १७ ते १९ मार्च हे तीन दिवस दररोज पहाटे ५ ते साडेसात या वेळेत हे शिबित घेतले जात आहे. त्याला तालुक्यातील तमाम जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला.

या शिबिरात जवळपास तीस हजार पेक्षा जास्त नागरिकांनी पहिल्या दिवशी योगा केला. या शिबिराने संपूर्ण तालुका योगमय झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. आज पहाटे पासूनच अक्कलकोट तालुका व शेजारच्या तालुक्यातून नागरिक मिळेल त्या वाहनाने लोक राजे फत्तेसिंह मैदानावर दाखल होत होते. सुमारे पावणेपाच वाजता रामदेवबाबा शिबीर स्थळी दाखल झाले. या शिबिराचा प्रारंभ सहकारमंत्री सुभाष देशमुख, डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले, बसवलिंग महास्वामी, पत्रकार राजा माने, सचिन कल्याणशेट्टी, डॉ सुमनादीदी, चंद्रशेखर खापणे, बापू पाडाळकर, श्रीराम लाखे, नितीन तावडे, ज्ञानेश्वर आर्य, सुनील क्षीरसागर, सुधा अळ्ळीमोरे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना बाबा रामदेव म्हणाले की दररोज सकाळी योग केल्याने जी उर्जा मिळते त्याचा सृजनात्मक उपयोग उद्योगवाढीसाठी आणि अर्थप्राप्ती साठी करून घेणे हिताचे आहे. या माध्यमातून अनेक लोकांना आज रोजगार मिळू लागला आहे. ते पुढे म्हणाले की, आपले शरीर सदृढ राखण्यासाठी आणि रोगमुक्ती मिळविण्यासाठी योग करण्याशिवाय पर्याय नाही. यातूनच पुढे भक्कम राष्ट्र बांधणी होणार आहे.योग हे आत्मबल निर्माण करून आत्म्याला प्रेरणा देते. कोणतेही वाईट विचार व कृत्य करण्यापासून परावृत्त होण्यासाठी निश्चितच लाभदायक आहे. योग शिबिरासारखे होणारे जिल्हा पातळीवरील उपक्रम विवेकानंद प्रतिष्ठानने अक्कलकोटला भरवून नेटक्या नियोजन आणि आयोजनाने मोठ्या प्रमाणात भरवून फत्तेसिंह मैदानात प्रचंड गर्दी 
खेचल्याने मान्यवर आणि उपस्थितांनी कौतुक करीत आहेत. याचे संयोजन विवेकानंद प्रतिष्ठान आणि सोलापूर जिल्हा योग समिती करीत आहे

Web Title: Yogaguru ramdevbaba yog camp got good response