तंत्रज्ञानाचा वापर करताना विचार करायला हवा - डॉ.आ.ह.साळुंखे

हुकूम मुलाणी
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

मंगळवेढा - सध्याच्या युगात तंत्रज्ञान आणि माध्यम आपल्या हाती आहे, त्याचा उपयोग कसा करायचा? त्याला सामोरं कसं जायचं हे ठरवलं पाहिजे. चुकीचे विचार करता कामा नये. काय खरे आणि काय खोटे हे सत्यता पडताळण्याची जिज्ञासा असली पाहिजे. त्याची चिकीत्सा करता आली पाहिजे. असे मत प्राच्यविद्यापंडित डॉ. आ.ह. साळुंखे यांनी व्यक्त केले,

येथील सि.बा.यादव प्रतिष्ठान वतीने आयोजित केलेल्या गुणवंत शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव प्रसंगी ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी बी.टी.पाटील हे होते यावेळी बी.पी.रोंगे, जि.प.सदस्या शैला गोडसे, सि.बा.यादव, प्रा. शिवाजीराव काळुंगे, अँड. बी. बी. जाधव, शंकर माळी बबन भोसले, विजय शिंदे, गणेश यादव, इंद्रजित घुले आदी उपस्थित होते या आ.ह साळुंखे यांच्या हस्ते पुरस्कार विजेते राकेश गायकवाड, अशपाक काझी. दहावी प्रथम येणा-या तालुक्यातील प्रत्येक शाळेच्या विद्याथ्यांचा रोख रक्कमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. डॉ. आ.ह. साळुंखे म्हणाले की, कृतज्ञतेचे अश्रू अतिशय विशूद्ध असतात. एक विद्यार्थी आपल्या शिक्षकाविषयी अपार कृतज्ञता बाळगतो, ती कृतज्ञता शिक्षकाने केलेल्या चागल्या कामाचे फलित असते.

आजचं युद्ध बुद्धीने लढायच असून शिवाजी महाराजांनी फक्त तलवार चालवली नाही तर अपार बुद्धीच्या जोरावर स्वराज्य  उभं केलं. अंध श्रद्धा सोबत घेऊन आपण नव्या जगात जगू शकणार नाही म्हणून जुन्या परंपरा मोडताना आणि नव्या स्वीकारताना प्रत्यक्ष प्रमाण काय हे पाहिलं पाहिजे शिवाय आपली उद्याची पिढी उमलून यायची असेल तर आपलंच डोकं वापरायलाच हवं.यावेळी जि.प.सदस्या शैला गोडसे,अॅड बी.बी.जाधव, शिवाजीराव काळुंगे, बी.टी.पाटील, यांची भाषणे झाली. प्रास्ताविक डॉ. भिमाशंकर बिराजदार यांनी केले सुत्रसंचालन राजेन्द्र जाधव यांनी तर आभार नितिन मोरे यांनी मानले.

Web Title: You should thing befor using technology - Dr.A.H. Salkunke