कऱ्हाडात युवकाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

सुमारे तिशीतील युवकाचा धारदार शस्त्राने खून करून मृतदेह रस्त्यापासून शेतात टाकण्यात आल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी त्वरीत ती माहिती पोलिसांना दिली.

कऱ्हाड - ओगलेवाडी-टेंभू रस्त्यालगत युवकाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली. मध्यरात्री सव्वाच्या सुमारास त्या युवकाची ओळक पटली. सचिन बबन कांबळे (वय 30, रा. बुधवार पेठ) असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. चोवीस तासांपूर्वी खूनाची घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

ओगलेवाडीहून टेंभूला जाणाऱ्या रस्त्यालगत स्टेशन फाट्यापासून जवळच फाटकांचे शेत नावच्या शिवारात युवक पडल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या लक्षात आले. पोलिस पाटील मुकूंद कदम यांनी खात्री केली. सुमारे तिशीतील युवकाचा धारदार शस्त्राने खून करून मृतदेह रस्त्यापासून शेतात टाकण्यात आल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी त्वरीत ती माहिती पोलिसांना दिली. खून झाल्याची माहिती मिळताच पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे, पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी खून झालेल्या युवकाचा धारदार शस्त्राने गळा चिरून व पोटावर वार करून खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी शोधाशोध केली असता काहीही सापडले नाही. अंधार पडल्याने शोध घेण्यात अडचण येत असल्याने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मध्यरात्री उशिरा मृतदेहाची ओळख पटली आहे. मात्र खून व खूनाचे कारण समजू शकलेले नाही.    
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Young boy has been murdered by a sharp weapon in Karhad