अय फडणवीसss अय राम शिंदेss नावानिशी हाका मारून तरुणाचे मुख्यमंत्र्याना प्रश्न (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत अय फडणवीसss अय राम शिंदेss अशा नावानिशी हाका मारुन प्रश्न विचारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत अय फडणवीसss अय राम शिंदेss अशा नावानिशी हाका मारुन प्रश्न विचारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सध्या नगर जिल्ह्यात आहे. महाजनादेश यात्रा नगर जिल्ह्यात असताना जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे हे सोबत होते. महाजनादेश यात्रा बाजून जात असताना एका तरुणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राम शिंदे यांना एकेरी नावाने प्रश्न विचारले आहेत. या तरुणांनी या व्हिडिओत पोलिस भरती, मेगा भरती या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

 

दरम्यान, ही महाजनादेश यात्रा कशासाठी काढली आहे. तर याचे उत्तर म्हणजे आम्ही विरोधी पक्षात असताना संघर्षं यात्रा काढत होतो. तर सत्तेत आल्यानंतर महाजनादेश यात्रा काढून पाच वर्षात केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा ठेवत आहोत, असे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young boy questioning chief minister in Mahajanadesh Yatra