बडा चंगा है जी कोल्हापूर... 

संदीप खांडेकर - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - शिवोत्सवाकरिता देशभरातून आलेल्या तरुणाईला तांबड्या-पांढऱ्या रश्‍श्‍यासह महालक्ष्मी मंदिर, रंकाळा तलाव, नगारखाना, न्यू पॅलेसने चांगलीच भुरळ घातली. कोल्हापूरचे वैभव म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देत कोल्हापुरी भेटीच्या ग्रेट मेमरीज आपल्या मोबाइलमध्ये बंदिस्त केल्या आहेत. "बडा चंगा है जी कोल्हापूर', "कोल्हापूर इज ग्रेट', "वुई विल कम अगेन टू कोल्हापूर' अशाच प्रतिक्रिया त्यांच्यातून व्यक्‍त झाल्या. 

बहुसंस्कृतीचा देश म्हणून भारत ओळखला जातो. या संस्कृतीचे प्रतिबिंब शिवोत्सवात पुरेपूर उमटले. मराठी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, आसामी, मणिपुरी, राजस्थानी, गुजराती भाषेतील शब्द विद्यापीठाच्या वातावरणात मिसळले आहेत. प्रत्येकाची भाषा जरी वेगळी असली तरी भारताची तरुणाई एकात्मतेने एकमेकांशी बांधली गेली आहे. कोल्हापूर शहर हे बहुढंगी आहे. महालक्ष्मी मंदिर, साठमारी, छत्रपती शिवराय व ताराराणी मंदिर, भवानी मंडप, जुना राजवाडा, न्यू पॅलेस, रंकाळा तलाव या ऐतिहासिक स्थळांसह कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्रांतही कोल्हापूरचा ठसा आहे. तांबडा-पांढरा रश्‍श्‍याची चवही अनेकांना भुरळ घालणारी आहे. 

शिवोत्सवाकरिता आलेल्या यंग ब्रिगेडने गेल्या चार दिवसांत विविध स्थळांना भेटी दिल्या. "पंजाबचे पुत्तर' तर तांबडा-पांढरा रश्‍श्‍याचे इतके फॅन झाले, की त्यांनी थेट राजारामपुरीतील हॉटेल्स गाठली. कोल्हापुरी भेळ, वडा-पाव, कांदा भजीवर ताव मारत विविध स्थळे त्यांनी डोळ्यांत साठवून घेतली. भाजीपाला मार्केटसह महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतल्यानंतर छायाचित्रे टिपण्याचा मोह यंग ब्रिगेडला आवरता आला नाही. 

कोल्हापूरबाबत जबलपूरच्या राणी दुर्गावती देवी विद्यापीठाचा स्वरूप चौधरी म्हणाला, ""विद्यापीठाचा परिसर जसा सुरेख आहे, त्याचप्रमाणे कोल्हापूर शहरही आहे. शहराची सैर करून आल्यानंतर वाटते, की भविष्यात या शहराला भेट देण्यासाठी नक्कीच येईन.'' चंदीगड विद्यापीठाचा अक्षय रावत म्हणाला, ""कोल्हापूरबद्दल खूप प्रेम वाटते. इथला इतिहास तेजस्वी आहे. या शहराच्या आठवणी घेऊन परतणार आहे. ज्या माझ्यासाठी मोलाच्या असतील.''

Web Title: young brigade kolhapur