कोण पटकावणार यंग इन्स्पिरेटर्स ॲवॉर्ड?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

कोल्हापूर - संपल्या एकदा परीक्षा. उन्हाळी सुटी आता सुरू होईल आणि साहजिकच यंदाच्या यंग इन्स्पिरेटर नेटवर्क- ‘यिन’च्या यूथ समीटची उत्सुकता तुम्हाला लागून राहिली असेल हो. यंदा ही यूथ समीट होणार आहे, वीस मे रोजी. आपल्यात सळसळती प्रेरणा पेरण्यासाठी येणार आहेत, विविध क्षेत्रांतील मास्टर्स. यानिमित्ताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केलेल्या यंगस्टर्सना ‘यंग इन्स्पिरेटर्स’ ॲवॉर्ड देऊन सन्मानित केले जाणार आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन ‘यिन’ परिवाराने केले आहे. प्रस्ताव पाठवण्याची अंतिम मुदत १५ एप्रिल आहे. 

तारुण्य म्हणजे नवप्रेरणांचा खळाळणारा झरा. ज्वलंत धमण्यांचं अविरत स्पंदन. मानाने मिरवण्याचा आणि काही तरी वेगळं करून दाखवण्याचा काळ. साहजिकच अनेक तरुण या काळात आपापल्या क्षेत्रात अनेक नव्या संकल्पना यशस्वी करत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा पुरस्काराने गौरव होणार आहे. चला तर मग आजच तुम्हीही अर्ज करा आणि मित्रांनाही सांगा. 
अधिक माहितीसाठी संपर्क - सूरज (८८५६०५२५५६), अवधूत (९९७५१३१२७०)

या आहेत कॅटेगरीज्‌
* कम्युनिटी सर्व्हिस- सोशल वर्क
* कला आणि संस्कृती  
* क्रीडा
* शिक्षण
* सायन्स-टेक्‍नॉलॉजी- इंजिनिअरिंग
* एक्‍सलन्स इन यूथ लीडरशिप
* उद्योग- स्टार्ट अप

काय आहेत निकष?
 अठरा ते तीस वयोगटातील तरुण-तरुणी अर्ज सादर करू शकतात.
 ॲकॅडमिक ॲचिव्हमेंट आणि पर्सनल गोल व इतर ॲचिव्हमेंटस्‌
 कोणत्या आव्हानांना पार केले, याची माहिती
 तुमच्या नवसंकल्पना आणि समाजाला त्याचा काय फायदा झाला?
 बातम्यांची कात्रणे, इतर पुरस्कारांची माहिती व छायाचित्रे. 

Web Title: young inspirators award