कृष्णा भैयावर सुरू झाले उपचार !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

बेवारस अपंग तरुणाला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आधार

सोलापूर : पाच्छा पेठ परिसरातील जमखंडी पुलाजवळ सात महिन्यांपासून मनोरुग्ण दिसणाऱ्या एका अपंग तरुणाला सामाजिक कार्यकर्त्यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. अखिल भारत नागरिक ग्राहक महासंघाचे पदाधिकारी रवींद्र जोगीपेठकर, योगीन गुर्जर यांच्या पुढाकारातून या अपंग तरुणाला आधार मिळाला आहे. सुरवातीला ती व्यक्ती दारू पिऊन पडली असावी असेच त्यांना वाटले. मात्र काही वेळ निरीक्षण केल्यानंतर तो मनोरुग्ण असावा असा अंदाज बांधण्यात आला.

परिसरात चौकशी केल्यावर तो सात-आठ महिन्यांपासून तिथे बसून असल्याचे समजले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आवाहन केल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी पुढे आले आहेत. त्याची दाढी व कटिंग करून त्याला अंघोळ घालण्यात आली. तसेच स्वच्छ कपडे घालून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांत त्याची नोंद बेवारस म्हणून करण्यात आली आहे.

त्या तरुणाला कृष्णा असे नाव देण्यात आले आहे. त्याला उपचारासाठी दाखल करण्यासाठी जोगीपेठकर आणि गुर्जर यांच्यासह नगरसेवक बाबा मिस्त्री, अतिश सिरसट, आर. पी. ग्रुपचे जयराज नागणसुरे, डॉ. शिवप्रसाद तीर्थ, कमलेश शिंदे, आनंद दासरी, उदयराज आळंदकर, रजनी आकुडे, ऋषीकेश कोनारीकर, रवी घोडकुंबे, दत्तू चिल्लाळ, आशाबी शेख आदींनी धडपड केली.

पाच मिनीट मे आएगी रिक्षा
कृष्णाला सात महिन्यांपूर्वी कोणीतरी रिक्षामधून आणून सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे. हिंदीत बोलणारा कृष्णा पाच मिनीट मे रिक्षा आएगी असे वारंवार म्हणत आहे.
 
Web Title: The young man abandoned by social workers with disabilities