वाद मिटवण्यास गेलेल्या तरुणावर चाकूहल्ला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - किरकोळ कारणावरून झालेला वाद मिटविण्यासाठी गेलेल्या तरुणावर तीन गुंडांनी चाकूहल्ला केला. त्यात तरुण गंभीर जखमी झाला. प्रमोद हंबीराव देवकर (वय 40, रा. सम्राटनगर) असे जखमींचे नाव आहे. पार्वती मल्टिप्लेक्‍सजवळ भरदुपारी हा प्रकार घडला. जखमीला सीपीआरमध्ये दाखल केले आहे. याप्रकरणी रात्री राजारामपुरी पोलिसांनी दोघांना अटक केली. फिरोज यासिन मुल्ला (वय 27) आणि मुजमीन खुदबुद्दीन कुरणे (28, दोघे रा. यादवनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांचा तिसरा साथीदार रेकॉर्डवरील गुन्हेगार स्वप्नील सातपुते याचा पोलिस शोध घेत आहेत. 

आर.के.नगर येथील हेमंत कदम आणि प्रमोद देवकर मित्र आहेत. दुपारी पावणेचारच्या सुमारास कदम पार्वती मल्टिप्लेक्‍ससमोरील एका चहा टपरीवर थांबले होते. चहा पित असताना स्वप्नील सातपुते आला. त्याने गाडीजवळ जाण्याचा प्रयत्न करताच कदम यांचा हात त्याला लागला. त्याने याचा जाब विचारत कदम यांना मारहाण करण्यास सुरवात केली. घाबरलेल्या कदम यांनी मोबाइलवरून ही माहिती देवकर यांना दिली. तसे तेही दाखल झाले. त्यांनी सातपुते याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. याबाबत कदम माफी मागण्यासही तयार झाले, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने फोन करून फिरोज मुल्ला व मुजमीन कुरणे यांना बोलवून घेतले. त्या तिघांनी देवकर यांना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. शेजारील वडापावच्या हातगाडीवरील चाकू घेऊन देवकर यांच्यावर हल्ला करण्यास सुरवात केली. हल्ल्यात देवकर यांच्या डाव्या हातावर, बोटावर आणि मानेवर खोलवर जखमा झाल्या. दरम्यान, याची माहिती नागरिकांनी राजारामपुरी पोलिसांना दिली. तसे हल्लेखोर तेथून पसार झाले. जखमी देवकर यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 
राजारामपुरी पोलिसांत याप्रकरणी स्वप्नील सातपुते, फिरोज मुल्ला आणि मुजमीन कुरणे यांच्यावर गुन्हा दाखल केला. सातपुते हा रेकॉर्डवरील असून, त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री फिरोज आणि मुजमीन यांना अटक केली; मात्र सातपुते हा पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

चाकू तुटला... 
पार्वती मल्टिप्लेक्‍सशेजारी एक वडापावची गाडी आहे. तिघा गुंडांनी गाडीवरील चाकू घेऊन देवकर यांच्यावर हल्ला करण्यास सुरवात केली. हल्ल्यात तो चाकू तुटल्यामुळे हल्लेखोर पसार झाले. नाही तर मोठा अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येत होते.

Web Title: Young man with knife attack