मुलीची छेड काढल्याप्रकरणी तरुणास सक्तमजुरीची शिक्षा

साडेसात हजार रुपये दंड
सागर सदामते
सागर सदामतेsakal

सांगली - अल्पवयीन मुलींची छेडछाड करणाऱ्या आरोपीस एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीचे नाव सागर दिलीप सदामते (वय २७, रा. पलूस, सांगली ) असे आहे. त्याला भारतीय दंडसंहिता कलम ३५४ डी अन्वये दोषी धरून एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा आणि साडेसात हजार रुपये दंड करण्यात आला आहे. ही शिक्षा विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सुनावली. सरकरपक्षातर्फे अतिरिक्त जिल्ह सरकारी वकील शैलेंद्र हिंगमिरे यांनी काम पाहिले.

या खटल्याची हकीकत अशी की, ऑक्टोबर २०१४ पासून आरोपी हा पीडीतेच्या घरासमोरून फिरत, पिडीत शाळेत व क्लासला असताना पाठलाग करणे, मोटारसायकल आडवी मारणे, मैत्री करण्यास दमदाटी करणे, बदनामी करण्याची श्रमकी देणे असे कृत्य सातत्याने करीत होता. तसेच पिडीतेकडे कोणी बघायचे नाही मी तिला घेवून फिरतोय असे महाविद्यालयात सांगत होता. पिडीतेचे आईवडिल व मध्यस्थांनी सांगूनही आरोपीमध्ये व त्याच्या वागणूकीमध्ये कोणताही फरक पडलेला नव्हता. त्यामुळे पिडीत मुलीने पलूस पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. या प्रकरणांचा सखोल तपास पलूस सहायक निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी करून आरोपीच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्याची सुनावणी विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे चांच्या न्यायालयात सुरू होती. याकामी सरकार पक्षातर्फे एकुण आठ साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध साक्षीपुराव्याचे आधारे यातील आरोपी सागर दिलीप सदामते यास एक वर्षाची शिक्षा सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com