जनावरे धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा तलावात बुडुन मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

कऱ्हाड : जनावरे धुण्यासाठी तलावात गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची घटना आज बामणवाडी (ता.कऱ्हाड) येथे घडली. रमेश धोंडीराम सावंत (वय ३५, मुळ रा.कोंडाईवाडी पोस्ट धामवड,ता.शिराळा) असे संबंधित युवकाचे नाव आहे. 

रमेश हा लहानपणापासुन बामणवाडी येथील त्याच्या मावशीकडे वास्तव्यास होता. बामणवाडीतील जांभळा नावच्या शिवारात कृषी विभागाच्या पाझर तलावात आज जनावरे धुण्यासाठी घेवून गेला होता. त्यादरम्यान त्याचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला.

जनावरे चारायला गेलेल्यांना त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिस पाटील व गावातील ग्रामस्थांना त्याची माहिती दिली. त्यांनी तातडीने तलावाकडे धाव घेवून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मृतअवस्थेत पाण्यात आढळुन आला. त्याचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. हवालदार सुरेश सावंत तपास करत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man who went to wash an animal drowned in a lake