म्हणून सुरु आहे तरुणांची भटकंती

सुस्मिता वडतीले
Saturday, 4 January 2020

ओंकार काटेगावकर, रोहित रव्वा, मयूरेश जाधव, विनायक गुड्डीया, राजकुमार वाघमारे व अक्षय रव्वा हे वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारे तरुण एकत्र आले. आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करून 2016 पासून जागृती करण्याची सुरुवात केली. आपल्या कामातून ते वेळ काढून शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना माहिती देत आहेत.

सोलापूर : डॉक्‍टर, इंजिनिअर व्हावं याबरोबर एमपीएससी, यूपीएससीद्वारे अधिकारी व्हावे यापैकी काही नाही झालं तर किमान खासगी क्षेत्रात तरी नोकरी मिळावी, अशी अनेकांची मानसिकता असते. पण खगोलशास्त्रामध्ये सुद्धा अनेक संधी असतात, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी सोलापुरातील सहा तरुणांनी एकत्र येऊन भटकंती सुरू केली आहे. यातील काहीजण नोकरीच्या शोधात आहेत तर काहीजण खासगी ठिकाणी नोकरी करत आहेत. "आम्हाला याची माहिती कोणी दिली असती तर याच्यात आम्हाला काम करण्यास आवडले असते. पण तेव्हा मार्गदर्शन मिळाले नाही. आता इतरांना तरी खगोलशास्त्राकडे जाता यावे, म्हणून आम्ही याबाबत माहिती देत असल्याचे त्यांनी सांगितले. 

No photo description available.

हेही वाचा : आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या... प्लिज सगळं थांबवा आता...
काय देतायेत माहिती

2016 पासून ओंकार काटेगावकर, रोहित रव्वा, मयूरेश जाधव, विनायक गुड्डीया, राजकुमार वाघमारे व अक्षय रव्वा हे वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारे तरुण एकत्र आले. आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करून जागृती करण्याची सुरुवात केली. आपल्या कामातून ते वेळ काढून शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना माहिती देत आहेत. यासाठी त्यांनी ॲस्ट्रोम ॲस्ट्रोनॉमिकल क्‍लबची स्थापना केली. त्यातून त्यांनी विज्ञानाच्या प्रसाराचा उपक्रम हाती घेतला. यामध्ये ते ब्रह्मांडाच्या निर्मितीपासून सध्याचा विस्तार, विविध तारे व त्यांचे गुणधर्म, अस्तित्वात असलेले वेगवेगळे नेबुला आणि त्याची तयार होण्याची प्रक्रिया आपल्याला माहीत नसते. ती विद्यार्थ्यांनी माहिती व्हावी म्हणून ते प्रयत्न करत आहेत. राजकुमार वाघमारे म्हणाले, ब्रह्मांडातील होणारी प्रत्येक प्रक्रिया महत्त्वाची आहे. या प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी दुर्बिणीचा वापर केला जाणार आहे. या दुर्बिणीने चंद्रावरचे खड्डे मोजता येतील इतकी त्याची क्षमता आहे. अनेकदा विज्ञान हा विषय फक्त पुस्तकापुरताचा माहिती असतो पण, त्यात करिअर करण्याच्या खूप संधी असतात. ती तरुणांपर्यंत पोचणे आवश्‍यक असते. म्हणूनच आम्ही याची जास्तीत जास्त माहिती व्हावी म्हणून जिल्हा परिषदांच्या शाळा निवडून माहिती देण्यासाठी जात आहोत. आमच्या कामातून वेळ काढून काही दिवस ठरवून आम्ही वेळ देतो, असेही त्यांनी सांगितले. 

 

Image may contain: one or more people and people standing

हेही वाचा : मोठी बातमी : सोलापूर झेडपी अध्यक्षपदासाठी मोहिते पाटलांची उद्धव ठाकरेंशी झाली होती चर्चा?
क्लबनेच बनविले दुर्बीण

ॲस्ट्रोम ॲस्ट्रोनॉमिकल क्‍लब हा खगोल व विज्ञान विषयाची जागृती करणारा क्‍लब आहे. यामध्ये थोर वैज्ञानिक आणि त्यांची कामे खगोलशास्त्राला समजून घेण्यासाठी महत्त्वाचे आहे हे येथे सांगितले जाते. शाळेतील विद्यार्थी पुस्तकातील चित्रातून खगोलशास्त्राचा अनुभव घेतात. त्यांना या गोष्टींची प्रात्यक्षिके, त्यांचे अस्तित्व आणि हालचाली पाहता येतात. या क्‍लबने स्वत:चेच एक दुर्बीण बनविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young people are moving around to give astronomy information